Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण

2 weeks ago 4
ARTICLE AD

IIT Bombay Sahil Wakode Death Case: राज्यात खळबळ उडवणाऱ्या आयआयटी बॉम्बेमधील बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे प्रकरणाच्या (Sahil Wakode Death Case) तपासात एक मोठी अपडेट समोर आली आहे. कॉपी करताना पकडले गेल्यानंतर आयआयटी बॉम्बेला दिलेल्या लेखी निवेदनात, साहिलने चूक केल्याचं मान्य केलं असून ही चूक पुन्हा न करण्याचे आश्वासन दिले होते होतं, सोबतच मला एक संधी द्या, अशी विनंती केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच साहिलने  (Sahil Wakode) परीक्षेची तयारी चांगली झाली नव्हती, म्हणून हे पाऊल उचलायचेही त्याने म्हटले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितलंय. या निवेदनावर आधारित पोलीस सविस्तर तपास करत असल्याचे सांगण्यात आले. (IIT Bombay Sahil Wakode Death Case)

दरम्यान, साहिल वाकोडे कॉपी करताना पकडला गेल्यानंतर त्याने लगेचच त्याच्या एका मैत्रिणीशी संवाद साधला, त्यात त्यानं सांगितलं की, त्याचा 'थर्मोडायनामिक्स थिअरी'चा पेपर चांगला गेला नाही, परिणामी त्याला चांगले गुण मिळवायचे असल्याने तो चिंतेत होता. तसेच, परीक्षेदरम्यान कॉपी करताना तो पकडले गेल्याचेही त्याने त्याचा मैत्रिणीला या संवादादरम्यान सांगितलं, असे देखील पोलीस सूत्रांनी नमूद केलेय. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

IIT Bombay Sahil Wakode Death Case: साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) येथील २२ वर्षीय विद्यार्थी साहिल वाकोडे याचा १८ सप्टेंबर २०२६ रोजी झालेला मृत्यू आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहे. परीक्षेत कथितपणे मोबाईल फोन आणि चॅटजीपीटीच्या (ChatGPT) वापरावरून सुरू झालेल्या या घटनेनंतर साहिलच्या मृत्यूने देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, मानसिक ताण आणि कथित जातिभेद यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, साहिलच्या पालकांनी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर जातीच्या आधारावर छळ केल्याचे आरोप केले आहेत. यानंतर विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निदर्शने केली, तर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्राँचने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याशिवाय, आयआयटी बॉम्बेनेही प्रकरणाच्या तपासासाठी १० सदस्यांची समिती स्थापन केली असून प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना रजेवर पाठवले आहे.

IIT Bombay Sahil Wakode Death Case:  सध्या तपासात कोणत्या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत?

या प्रकरणात सध्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहे. पोलीस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की परीक्षा हॉलमध्ये नेमके काय घडले होते आणि साहिल व प्राध्यापकांमध्ये कशा स्वरूपाचे संभाषण झाले होते. याशिवाय, परीक्षेनंतर साहिलची मानसिक आणि भावनिक स्थिती कशी होती, त्याच्यासोबत कॅम्पसमध्ये इतर प्रकारची कोणती घटना घडली होती का, आणि कुटुंबाकडून करण्यात आलेल्या जातिभेदाच्या आरोपांच्या समर्थनात कोणते पुरावे उपलब्ध आहेत, याचीही तपासणी केली जात आहे. पोलीस सीसीटीव्ही, डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाब या सर्व माहितीच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!

Read Entire Article