Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; आगीत होरपळून दोघांचा जागीच दुर्दैवी अंत; टायर फुटल्याने अमरावती जवळ घडली घटना

2 weeks ago 2
ARTICLE AD

Samruddhi Mahamarg Amravati Accident: अमरावती जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीजवळच्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) ट्रकचा भीषण अपघात (Amravati Accident) झाला आहे. यात अचानक टायर फुटल्याने ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. तर या भीषण आगीत होरपळून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे. (Samruddhi Highway Amravati Accident News)

दरम्यान, आज (12 ऑक्टोबर) सकाळी चैनल क्रमांक 127 वर एका ट्रकचा टायर फुटून ट्रक जळल्याने होरपळून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. तर हा ट्रक फुलकोबी घेऊन वाहतूक करत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरु केलीय. मात्र समृद्धी महामार्गावरील या अपघाताच्या घटनेनं पुन्हा एकदा अपघातांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

अमरावती- अकोला महामार्गावर ट्रकला भीषण; आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक

दुसरीकडे अशीच एक अपघाताची घटना अमरावती- अकोला महामार्गावर घडली आहे. यात एका ट्रकला भीषण आग लागली असून या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. दरम्यान, महामार्गावर ट्रक जळल्याने महामार्गावर काहीकाळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरु केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक दुसऱ्या लेंथवर वळल्यावर एकाच लेंथवर वाहतूक सुरु होती. अशावेळी भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारचालक महिला गंभीर जखमी झाली असून जखमी कालचालक महिलेवर खाजगी रुग्णाण्यात उपचार सुरू आहे.

Bhandara: ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना; आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेनं सुरक्षित प्रसूती

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसनं मुंबई येथून सकीना खातून या कुटुंबासह पश्चिम बंगालला निघाल्या होत्या. भंडाऱ्याच्या तुमसर रोड इथं रेल्वे पोहचताचं त्यांना अचानक प्रसूतकळा आल्यात. याची माहिती भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे सुरक्षा उपनिरीक्षक एस. एस. ढोके व कर्मचाऱ्यांना मिळाली. यावेळी महिलेला तातडीनं स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सुरक्षित उतरवून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केलं. यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला आहे. सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळं महिलेला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar: एसटीच्या खरेदीत गैरव्यवहार! बाजारभावापेक्षा 30 टक्के अधिक दराने साहित्य खरेदी; विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्री अन् परिवहन मंत्र्यांना पत्र धाडलं

Read Entire Article