Sangli District Bank Election: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sangli District Central Cooperative Bank) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत प्रस्थापितांना पराभूत करायचे असेल तर महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र लढणे गरजेचे आहे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, बँक निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या स्थानिक नेतृत्वासोबत प्राथमिक चर्चा केली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी अशी भाजपची इच्छा असून, त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sangli District Bank Election: ...तर आपल्याला एकत्र लढावं लागेल

"सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत प्रस्थापितांना हरवायचं असेल तर आपल्याला एकत्र लढावं लागेल. याबाबत आमच्या स्थानिक भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या नेत्यांशी चर्चा केली असून जिल्हा बँकेची निवडणूक ही एकत्र लढवावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Sangli District Bank Election: महायुती एकत्र लढणार की वेगळी? चित्र लवकरच स्पष्ट होणार

दरम्यान, आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) कडून अनेक उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही प्रतिष्ठेची निवडणूक महायुती (Mahayuti) म्हणून एकत्र लढली जाणार की सर्व पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार? याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

Gokul Election: महायुतीची गोकुळच्या जागा वाटपाची दुसरी बैठक देखील निष्फळ

दरम्यान, कोल्हापूरच्या 'गोकुळ'च्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यासाठी बोलावण्यात आलेली दुसरी बैठक देखील निष्फळ ठरली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बैठकीदरम्यान ठरावधारकांच्या ओळख परेडवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे बैठकीतील वातावरण कमालीचे तापले होते. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता होत नसल्याने अखेर गोकुळच्या जागावाटपाचा तिढा आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी गेला आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'गोकुळ'बाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Suresh Dhas on Devendra Fadnavis: ‘शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा देवेंद्र फडणवीस’; सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने, ‘ठाकरेंची जत्रा’ म्हणत विरोधकांना डिवचलं!