Sanjay Gaikwad on Shweta Mahale बुलढाणा : मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर श्वेता महाले यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. तर वीजपुरवठा खंडित करण्यामागे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) असल्याचा संशयही त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त करत हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा, असं म्हणत आमदार गायकवाडांना ओपन चॅलेंज दिलंय. दरम्यान, आमदार श्वेता महालेंनी (Shweta Mahale)  दिलेल्या या थेट आव्हानाला आता संजय गायकवाड यांनीही प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला केला आहे. 'राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ' असं त्यांनी म्हटलंय. तर जनतेने संजय गायकवाडच्या रॅली पाहिलेल्या आहेत, मी कशाला कुणाला घाबरू, असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले आहे. (Sanjay Gaikwad on Shweta Mahale)

Sanjay Gaikwad : 'बाप तो बाप रहेगा' माणसाने बोललं तर बरं, पण एखाद्या बाईने म्हटले की....

राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाने रॅली काढून वाढदिवस साजरा केला, याचं मला फार वाईट वाटलं. मला फाईट करता, तर तुम्ही माझ्याशी विकासाची फाईट करा. मी जर एखाद्या शेतकऱ्याला मदत केली तर तुम्हीही मदत द्या. वाढदिवसाला खर्च केल्यापेक्षा एखादे गरीबाला मदत करा. आम्ही अशी उधळपट्टी कधी करत नाही. आमचेही वाढदिवस होतात, पण आम्ही एव्हढे कधी खर्च करत नाही. बाप तो बाप रहेगा, हे माणसाने बोललं तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे तर बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. हे शोभते का बोलायला. मग राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी आम्ही दाखवून देऊ, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला आहे.

Sanjay Gaikwad : फक्त इकडची भाजपा काँग्रेसच्या दावणीला बांधल्या जाणार नाही, याची काळजी घ्या

आमदार श्वेता महाले एक महिला आमदार आहे. माझी बहीण आहे, ताई आहे. मला समोर येऊन बोला म्हटल्या, बँक निवडणुकीत आमही सोबत होतो. एका ताटात आम्ही एका चमचाने जेवण केले, त्यामुळे समोर येण्याचा काही प्रश्न नाही. वाढदिवसाला स्पर्धा करणे हा काही विषय नव्हता. त्यांनी बुलढाणामध्ये भाजप वाढवावी आम्ही, चिखलीत शिवसेना वाढवू, कशाला विरोध करता. फक्त इकडची भाजपा काँग्रेसच्या दावणीला बांधल्या जाणार नाही, याची काळजी घ्या असा सल्लाही आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला आहे.

Sanjay Gaikwad माझ्याकडे हरामाचा पैसे नाही. मी अशी पैशाची उधळपट्टी करणार नाही

रॅली पाहून घाबरले आणि लाईट बंद केली म्हणता तर संजय गायकवाडच्या रॅली लोकांनी पाहिलेल्या आहेत, त्यामुळे मी कशाला घाबरू . आमच्याही कार्यक्रमाता लाईट जाते. मी कर्नाटकला होतो, माझा काही संबंध नाही. मी वाढदिवसाच्या रॅलीला प्रतिउत्तर देत नाही. माझ्याकडे हरामाचा पैसे नाही. मी अशी पैशाची उधळपट्टी करणार नाही. वाढदिवस साजरा करताना आम्हाला माणसे काही भाड्याने आणावे लागत नाही. या या माझा वाढदिवस आहे मला शुभेचा द्या! असं म्हणावं लागत नाही. अधिकाऱ्यांना, पोलिसांना कामाला लावा, असा कुठे वाढदिवस असतो का? यारे या आम्हाला शुभेचा द्या, असं कुठे असते का? शुभेच्छा मनातून देत असतात. असे म्हणत संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त निघालेल्या रॅलीवरूनही डिवचलं आहे.

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचा विकासाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळतोय

बुलढाण्याचा विकासाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळतोय. कोणच्या काहीही बोलण्यात अर्थ नाही, जनतेला माहिती आहे की शहरात विकास आहे की कचरा असे म्हणत बुलढाण्याच्या कचरा चिखलीपर्यंता आला, या श्वेता महालेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डीजेमध्ये स्वतःची मिरवणूक काढतो, मुख्यमंत्री एकीकडे पत्र काढतात की, माझ्या वाढदिवसाला डीजे लावू नका, पोस्टर, बॅनर लावू नका आणि तुमचाच खाजगी सचिव जर ऐकत नसेल तर? गणपती आला की डीजेचाच प्रश्न का येतो? बाकी वेळी शिवजयंती, 14 एप्रिल, लग्न होतात, सगळे कार्यक्रम होतात., प्रत्येक ठिकाणी डीजे येतो, मग गणपती वेळीसच का डीजेचा प्रॉब्लेम येतो? आवाज जास्त असेल तर पोलिसाने त्यावर बंदी घातली पाहिजे. पण केवळ हिंदू धर्माच्या गणपती वेळेस डीजे बंद करणे चुकीचे आहे. असेही संजय गायकवाड म्हणाले.

Sanjay Gaikwad : बुलढाण्यात राजकीय कुरघोडी, महायुतीत ‘ऑल इज वेल’?

बुलढाण्यात भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी निघालेल्या रॅलीदरम्यान आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे, याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत नेमकं कुणाला खुणावलं? याची चर्चा आता बुलढाणा शहरात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच आता रॅलीतील या कृतीमुळे बुलढाण्यात महायुतीत ‘ऑल इज वेल’ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांच्यावर पुन्हा तोफ डागत प्रत्युत्तर दिलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...