Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange: ‘लीलावतीमध्ये जरांगेंचा मुलगा ॲडमिट झाला, त्याच ठिकाणी कट शिजला, एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली’; डॉ. संजय लाखे पाटलांचा सनसनाटी आरोप

1 month ago 7
ARTICLE AD

Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये (Government Delegation) झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपले उपोषण (Hunger Strike) स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. हे आंदोलन मराठा समाजासाठी आहे की राजकीय अजेंडा? विखे पाटील यांना समजून आणि सांभाळून घ्या असे जरांगे म्हणाले, त्यामुळे जरांगेचे आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही तर राजकीय सुपारी घेऊन विखे पाटील यांना प्रमुख आणि प्रोजेक्ट करणे हेच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी जरांगे यांचे हे आंदोलन आहे. एकनाथ शिंदे यांनी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमून दस्तावेज शोधण्याचे काम केले असून राज्यातील 58 लाख नोंदी ह्या 1967 पासूनच्या नोंदी आहेत. या आंदोलनातून घटनाबाह्य मागण्या केल्या जात आहेत. हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा असा वेगळा उल्लेख आहे, त्यामुळे पाटोद्यात वैधानिक मूर्खपणा करण्यात आला. हैदराबाद संस्थानात पंजाबराव देशमुख यांनी चालवलेली चळवळ मराठ्यांना मान्य नव्हती. बेकायदेशीररीत्या जमाव जमवून टोळ्या निर्माण करून बेकायदेशीर आंदोलने केली जात आहेत आणि त्यात विखे पाटील सुद्धा सहभागी आहेत. एक वर्ष 20 दिवस झाले तरी हैदराबाद गॅझेटप्रमाणे एकही प्रमाणपत्र मिळाले नाही आणि मिळू शकत नाही, त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे मिळालेले सर्टिफिकेट मराठ्यांनी स्वीकारू नये, असे त्यांनी म्हटले.

Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange: एकनाथ शिंदे यांचे चारित्र्यहनन करण्याची सुपारी घेतली गेली

डॉ. संजय लाखे पाटील पुढे म्हणाले की, लीलावतीमध्ये जरांगे यांचा मुलगा ॲडमिट झाला, त्या ठिकाणी कट शिजला आणि त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली गेली. ज्या शिंदेंनी साडेतीन लाख प्रमाणपत्र कुणबींना दिली, एसईबीसी (SEBC) प्रमाणपत्र दिली, त्या एकनाथ शिंदे यांच्यावर एकच प्रमाणपत्र दिल्यावर तुम्ही शिव्या देणार का? सामाजिक आंदोलनाचा बुरखा घालून एकनाथ शिंदे यांचे चारित्र्यहनन करण्याची सुपारी घेतली गेली आहे, असा आरोप त्यांनी केला. तुमच्या गद्दारीचा डाव असतो अशी जी स्टेटमेंट चालू होती, त्या व्यासपीठावरती ते कोणालाही बसू देत नाहीत. अंबादास दानवे व्यासपीठावर गेले, त्यांच्या संमतीने दानवे बोलले आणि त्यानंतर अंबादास दानवे माध्यमांना बोलले. यातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात राजकीय आघाडी त्यांनी उघडली असून मराठवाड्यातील लोकांची फसवणूक केली आहे, असे देखील त्यांनी म्हटले.

Sanjay Lakhe Patil On Radhakrishna Vikhe: विखे पाटील यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे

जरांगेंसारख्या लोकांनी समाजाचे नेतृत्व करू नये आणि विखेंना मराठा समाजाचे वाटोळे करायचे आहे, असा घणाघात करत डॉ. लाखे पाटील म्हणाले की, विखे पाटील यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही मराठा समाजाला वेठीस धरत आहात, यापुढे त्यांनी मराठा समाजाची फसवणूक करू नये. विखेंना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण तुमची लायकी नाही, तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही, त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या उपसमितीचा राजीनामा द्यावा. विखेंना कशासाठी सांभाळायचे आहे? कृष्णा आणि गोदावरी खोऱ्याचे मंत्री म्हणून सांभाळायचे का? विखे नालायक माणूस आहेत. मुख्यमंत्री मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्याचे काम करायचे म्हणत आहेत, त्याच्या उलटे काम विखे पाटील करत आहेत. मनोज जरांगे आणि विखे पाटील यांची अभद्र युती आहे. ही सामाजिक युती नाही. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जालन्यात किंवा संभाजीनगरमध्ये कृतज्ञता सोहळा कार्यक्रम घेऊ. जरांगे हे राजकीय सुपारी घेऊन आंदोलन करत असून विखे पाटील यांनीच ही सुपारी दिली आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर

Read Entire Article