Sanjay Raut on Sanjay Jadhav: 'जे ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार?' बंडू जाधवांवर राऊतांचा घणाघात

2 months ago 5
ARTICLE AD

Sanjay Raut on Sanjay Jadhav: ठाकरे गटातून शिंदेसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव (Sanjay Bandu Jadhav) यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला होता, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पाडला. या घडामोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडू जाधवांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Sanjay Jadhav: बंडू जाधवांना निवडून आणण्यात जरांगेंचा मोठा वाटा

संजय राऊत म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाचे नेतृत्व करतात. ते प्राण पणाला लावून लढत आहेत. सतत उपोषण करून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे, हे मी स्वतः पाहिले आहे. मध्यंतरी त्यांचे चिरंजीव हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितले होते की, सारखे आंदोलन, उपोषण करून आपल्या प्रकृतीची वाट लावू नका. मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यात उपोषणाला बसलेले असताना आणि वातावरण तप्त असताना परभणीच्या खासदारांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलावून जो मेळावा घेतला, तो टाळावा अशी जरांगे पाटलांची भूमिका होती. समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात त्यांची ती भूमिका होती. त्यांची तळमळ, तडफड मी सुद्धा काल पाहिली. कारण बंडू जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटलांची फार मोठी मदत झाली, हे सत्य आहे. त्यामुळे जरांगेंनी अपेक्षा केली असेल की, एवढा त्याग तुम्ही करा, तर त्यांनी तो करायला हवा होता," अशी टीका त्यांनी केली.

Sanjay Raut on Sanjay Jadhav: जरांगे धडा शिकवणार

संजय राऊत पुढे म्हणाले कि, "बंडू जाधव हे कोण आहेत? त्यांनी इतकी वर्ष ठाकरेंकडे सत्ता भोगली, पण ते ठाकरेंचे होऊ शकले नाहीत. सर्व पदं भोगली. ते मनोज जरांगे यांचे कसे होतील? ते नवीन नवीन आई-बाप शोधत असतात असे दिसत आहे. पण आता त्यांच्यामध्ये काय होतं ते बघू, कारण हा शेवटी अंतर्गत लढा आहे. या खासदाराची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी ठाकरेंशी गद्दारी केली. जो माणूस ठाकरेंचा होऊ शकत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना धडा शिकवण्याची भूमिका घेतलेली आहे. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. धडा आम्ही देखील शिकवू. जे सगळे गद्दार गेले आहेत ते पुन्हा संसदेत जाणार नाहीत, याची व्यवस्था शिवसैनिकांनी केलेली आहे," असे त्यांनी म्हटले.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

" आरक्षण विषयावर मुख्यमंत्री कुंपणावर बसून आहेत. त्यांनी कधीही मार्ग काढलेला नाही. उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चा करू, ते ज्युनियर मंत्री पाठवतात चर्चा करायला. बाकी सगळ्या गोष्टीत तुमचे गांभीर्य आहे, पण मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष दिले पाहिजे. पहिल्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण देणार होते, काय झाले त्याचे? ते वाद घडवतात. निवडणूक आली की आश्वासन देतात आणि पुन्हा विसरतात," अशी टीका देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आणखी वाचा

Abhijeet Dipke on RSS Mohan Bhagwat: भाजपला ते RSS पेक्षाही मोठे असल्याचं वाटू लागलंय, पंतप्रधान मोदी मोहन भागवतांचं ऐकत नाहीत: अभिजीत दिपके

Read Entire Article