Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT

1 month ago 5
ARTICLE AD
<p>Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT</p> <p>ठाण्यामध्ये अख्ख महाराष्ट्र येईल, नाहीतर एकनाथ शिंदे &nbsp;यांच्या घराजवळ जाऊ, असे म्हणत खासदार संजय राऊत &nbsp;यांनी ठाण्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणानंतर ठाण्यात जाऊन ठणकावलं. या हत्या प्रकरणात दोघांची नावे FIR मध्ये घ्या, नातेवाईक पुरावे देत आहेत. गुन्हेगारासोबत राजेंद्र शिंदे याचे फोटो आहेत. सिस्टीममधून सर्वाचा विश्वास उडाला आहे. मुलाच्या म्हणण्यानुसार FIR मध्ये नाव घ्या, असे म्हणत मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना आरोपी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे मुख्य सूत्रधार आहेत, सूत्रधार दोन जण आहेत, कधी कारवाई होणार. आम्हाला चौकशीसाठी कधीही बोलवा, पण FIR मध्ये ही दोन नावे टाका, असे संजय राऊत यांनी म्हटले. ठाण्यासारख्या शहरात अशी घटना होत आहे, पोलिसांची अब्रु जात आहे. जोपर्यंत FIR मध्ये दोघांची नावं टाकली जात नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेह घेऊन जातो, आम्ही हटणार नाही, असा इशाराच संजय राऊतांनी दिला होता. त्यानंतर, पोलिसांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींची नावे पुरवणी जबाबात घेण्यात आल्याची माहिती दिली.&nbsp;</p>
Read Entire Article