Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

2 weeks ago 2
ARTICLE AD
<p><br />येणाऱ्या काळात भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर खदखद दिसू लागले. नरेंद्र मोदी हे येत्या मार्च महिन्यापर्यंत सत्तेवर राहणार नाहीत. भाजपमध्ये सध्या प्रचंड दुफळी नव्हे तिफळी माजली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. दिल्लीतील आंदोलन रोखण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जात आहे. यावरुन सरकारवर टीका होत असतानाही एकही मंत्री नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची बाजू घेताना दिसत नाही. आगामी काळात भाजपमधील अनेक नेते मोदी-शाह यांच्यापासून वेगळे होतील. सध्या मोदी आणि शाह सैन्यबळाचा वापर करुन सत्ता चालवत आहेत. भाजपचे (BJP) चार मोठे नेते सध्या वेगळ्या मनस्थितीत आहेत. यामध्ये संघातील एका मोठ्या नेत्याचाही समावेश आहे. त्यामुळे येत्या सहा ते सात महिन्यांत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावरुन पायउतार होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Delhi CJP Protest)</p> <p>यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतील आंदोलनावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले. हा विषय हा फक्त सीजेपीबाबतचा नाही तर देशाचा लोकशाहीचा आहे. हे आंदोलन थांबलेले नाही. माजी मुख्यमंत्र्यांना आणि खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले &nbsp;आहे. या देशात आणीबाणी लागली आहे, हे मान्य केले पाहिजे. हिटलरनेही अखेरच्या काळात हेच केले होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली. दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. सरकार पूर्णपणे घाबरले आहे. मोदी-शाह दरवाजे बंद करुन बसले आहेत. मोदी आणि शाह यांच्या निवासस्थानाला छावणीचे स्वरुप आले आहे. डरपोक गृहमंत्री हा देशाचं संरक्षण काय करणार?,असेही संजय राऊत यांनी म्हटले.</p>
Read Entire Article