<p>Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र</p>
<p>राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. राज्यातील सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद यांसारखी पिके पावसाअभावी करपून गेली असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे. यासंदर्भात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना 9 मागण्यांचे पत्र पाठवले आहे. शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि ग्रामीण जनजीवनावर निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, वरील मागण्यांवर मुख्यमंत्री महोदय सकारात्मक निर्णय घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करतील, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.</p>