Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

2 weeks ago 4
ARTICLE AD

ज्या महिलेने वयाच्या २५ वर्षांपर्यंत शेतात पाऊलही ठेवलं नव्हतं, तीच आज अवघ्या ४० गुंठे जमिनीतून आपली शेतीची कमाई १.६३ लाखांवरून ११.९६ लाखांपर्यंत घेऊन गेली आहे. कमी जमीन, शेतीचा अनुभव नसलेली सुरुवात आणि त्यानंतर लाखोंपर्यंत पोहोचलेला हा प्रवास नक्कीच लक्ष वेधून घेणारा आहे. ही गोष्ट आहे खडक माळेगावच्या रेखा रमेश रायते यांची.
मुंबईत राहणाऱ्या रेखाताई विवाहानंतर १९९७ साली खडक माळेगावात आल्या. उच्चशिक्षित असलेल्या रेखाताईंना शेतीचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. कुटुंबाकडे एक एकर शेती आणि किराणा दुकान एवढीच उत्पन्नाची साधनं होती.शेतीची ओळख नव्हती, पण परिस्थितीपासून दूर जाण्याऐवजी त्यांनी ती स्वीकारली. हळूहळू शेतीची कामं शिकून घेतली. अनुभव वाढत गेला आणि पुढे त्यांनी द्राक्षशेती करण्यास सुरुवात केली.मात्र इथे एक मोठी अडचण होती—जमीन कमी होती.अवघ्या ४० गुंठ्यांत द्राक्षं पिकवायची आणि ती योग्य बाजारपेठेत विकायची, हे आव्हान होतं. कमी प्रमाणातील मालामुळे मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचणं सहज शक्य नव्हतं.यावर रेखाताईंनी एकट्याने मार्ग शोधला नाही; त्यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद वापरली.सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून अनेक छोटे शेतकरी एकत्र आले. मालाचं एकत्रित संकलन झालं आणि छोट्या शेतकऱ्यांनाही मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. रेखाताईंच्या द्राक्षांनाही विविध देशांमध्ये निर्यात होऊ लागली.रेखाताई सांगतात,“क्षेत्र कमी असलं तरी शेतकरी एकत्र आले, तर मोठं काम करता येतं.”या सामूहिक ताकदीसोबतच रेखाताईंनी द्राक्षशेतीतही सातत्याने सुधारणा केली. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वातावरण द्राक्षशेतीसाठी प्रतिकूल होतं. मात्र त्यांनी ‘आर-३६’ या नवीन द्राक्ष वाणाची लागवड केली होती. त्यामुळे प्रतिकूल वातावरणाचा परिणाम तुलनेने कमी झाला आणि उत्पादनात चांगली वाढ झाली.
उत्पादन आणि उत्पन्नातील वाढ
वर्ष
उत्पादन
उत्पन्न
२०२४
२.८ मेट्रिक टन
₹१.६३ लाख
२०२५
४.७ मेट्रिक टन
₹५.६० लाख
२०२६
८.९ मेट्रिक टन
₹११.९६ लाख

या आकडेवारीतून त्यांच्या शेतीतील झालेली वाढ स्पष्ट दिसते. २०२४ मधील ₹१.६३ लाखांवरून २०२६ मध्ये उत्पन्न ₹११.९६ लाखांपर्यंत पोहोचलं.पण रेखाताईंसाठी या आकड्यांचं महत्त्व केवळ शेतीपुरतं मर्यादित नाही.शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हातभार लावला. एवढंच नाही, तर २०२१ मध्ये स्वतःचा बंगला बांधून घराचं स्वप्नही पूर्ण केलं.आज रेखाताईंचे पती किराणा दुकानाचं काम पाहतात, तर रेखाताई घर आणि शेतीचं नियोजन सांभाळतात. द्राक्षबागेची देखभाल, शेतातील कामांचं नियोजन आणि शेतीशी संबंधित निर्णयांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.रेखाताईंचा प्रवास केवळ ४० गुंठ्यांतून मिळालेल्या उत्पादनाचा नाही. शेतीचा अनुभव नसतानाही त्यांनी शिकत शेती स्वीकारली, कमी क्षेत्राची मर्यादा सामूहिक बाजारपेठेच्या माध्यमातून दूर केली आणि त्यातून कुटुंबाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक स्वप्नांना आकार दिला.

Read Entire Article