Shiv Sena Symbol Hearing: शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?

1 month ago 8
ARTICLE AD

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज (15 सप्टेंबर) दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी (Shivsena Name And Symbol Hearing) होणार आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हे प्रकरण सर्वोच न्यायालयात अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या वतीने नीरज किशन कौल आपली बाजू मांडत आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुरू असलेला युक्तिवाद संपला आहे. आज पुन्हा दुपारी दोन वाजल्यापासून या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्य कांत , जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

दरम्यान, मागील सुनावणीत बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेली पक्षघटना उद्धव ठाकरेंनी का चुकीच्या पद्धतीने बदलली, असा सवाल शिंदेंच्या वकिलांनी उपस्थित केला होता. अशातच आजपासून पुन्हा एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद सुरू राहणार असून त्यानंतर सॉलिसिटर जनरल निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांची बाजू सर्वोच न्यायालयासमोर मांडतील, अशी माहिती आहे. त्यामुळे आज न्यायालयात नेमकं काय घडतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी

गेल्या महिन्याभरापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी सुरु आहे. राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहणे गरजेचं आहे असं या आधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतली, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला. तर शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे पक्षात एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता, असा दावा शिंदेंच्या वकिलांनी केला. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्याचं वकिलांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख पद हे 2013 पर्यंत होतं. पण बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर हे पद गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष हे पद अस्तित्वात आलं. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. ती जबाबदारी कुणाची होती? या चुका उद्धव ठाकरे यांनी सुधारायला हव्या होत्या, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला.  त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय दावे-प्रतिदावे केले जातात आणि त्यावर कोर्ट काय निर्णय देतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Read Entire Article