Shivendraraje Bhosle on Shashikant Shinde: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Central Cooperative Bank) निवडणुकीचे वेध लागताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. बँकेच्या ठराव घेण्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. जावळी तालुक्यातील दहीहंडी उत्सवादरम्यान (Dahihandi Festival) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत नाव न घेता शशिकांत शिंदे यांना थेट इशारा दिला आहे.

Shivendraraje Bhosle on Shashikant Shinde: जावळीत शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना इशारा

दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावरून बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले आक्रमक पवित्र्यात दिसले. आपल्या हितचिंतकांना आणि विरोधकांना कडक इशारा देताना ते म्हणाले, "जंगल मे घुमते वक्त जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की जंगल मे शेर नही है... माझ्या हितचिंतकांना सांगतो, उगीच डीवचण्याचे, काड्या घालायचे काम करू नका, तुम्हाला ते परवडणार नाही," असे थेट इशारा त्यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांना दिलाय.

Satara News: सातारा जिल्ह्यात राजकीय वर्चस्वाची लढाई

शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, तर शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते आहेत. सातारा-जावळी मतदारसंघात या दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सहकारी संस्था आणि विशेषतः सातारा जिल्हा बँकेतील वर्चस्वावरून या दोन नेत्यांच्या गटांमध्ये कायम राजकीय स्पर्धा पाहायला मिळते.

गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या ठरावांवरून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता जावळीतील दहीहंडीच्या मंचावरून शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण (Satara Politics) अधिकच गरम झाले असून आगामी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय कलगीतुरा अधिक रंगण्याची शक्यता आहे. आता शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या इशाऱ्यावर शशिकांत शिंदे काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री उच्चस्तरीय बैठक, मनोज जरांगेंच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर चर्चा, काय-काय घडलं?

Manoj Jarange Patil health: मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, 7 किलो वजन घटलं, शुगर लेव्हल ड्रॉप; मध्यरात्री उदय सामंतांचा फोन