Solapur Crime news: करमाळयात शासकीय बैठकीत जातीवाचक अपशब्द; मंडळ अधिकारी, तलाठ्यावर गुन्हा दाखल

1 month ago 8
ARTICLE AD

Solapur Crime news: शासकीय बैठकीदरम्यान जातीवाचक अपशब्द वापरून सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप करीत महिला मंडळ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून करमाळा पोलिस ठाण्यात मंडळ अधिकारी राजकुमार पांडेकर व तलाठी गोरक्षनाथ ढोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा (Solapur Crime News) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. (Solapur news)

Solapur Crime News: जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप

तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित महिला मंडळ अधिकारी म्हणून करमाळा तालुक्यात कार्यरत असून आरोपींसोबत शासकीय कामकाजाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क होता. 27 डिसेंबर 2025 रोजी आयोजित शासकीय बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बैठकीत महसूल विभागातील कामकाजासंदर्भात चर्चा सुरू असताना राजकुमार पांडेकर यांनी आक्षेप घेतल्याचे तसेच त्यानंतर वाद निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी जातीचा उल्लेख करून अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, दोन्ही आरोपींनी अंगावर धावून येत धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने तत्काळ पोलिसांत तक्रार देता आली नाही, असे फिर्यादीने नमूद केले आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकाराची माहिती देऊनही अपेक्षित कारवाई न झाल्याने अखेर १० सप्टेंबर 2026 रोजी करमाळा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला आहे. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

Crime News: स्मशानभूमीच्या वादातून शेवगा खुर्दमध्ये तुफान हाणामारी; पाच जण गंभीर जखमी; दोन्ही गटांतील 40 हून अधिक जणांवर गुन्हे

संग्रामपूर तालुक्यातील शेवगा खुर्द येथे स्मशानभूमीच्या जागेचा जुना वाद उफाळून आल्याने पोळ्याच्या दिवशी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगड, विटा व लाठ्याकाठ्यांनी झालेल्या मारहाणीत महिलांसह अनेक जण जखमी झाले. या घटने प्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील ४० हून अधिक जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका गटाविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या गणेश पिवतकार, मधुकर पिवतकार, भुरा सोनोने, प्रदुम्न सोनोने आणि गणेश सोनोने यांना प्रथम शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले

इतर महत्वाच्या बातम्या

Laxman Hake: मोठी बातमी! सोलापुरात लक्ष्मण हाकेंसोबत अज्ञात तरुणांची झटापट झाल्याचा आरोप; मोहोळमध्ये गुन्हा दाखल, दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Read Entire Article