Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Someshwar Sahakari Sakhar Karkhana) निवडणुकीत दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोटो आणि नावाच्या वापरावरून सुरू झालेल्या वादात आता एक नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजितदादांचा फोटो आणि नाव वापरण्यावर घातलेल्या बंदीच्या विरोधात पॅनेल प्रमुख पुरुषोत्तम जगताप (Purushottam Jagtap) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयाला आव्हान दिले असून, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची जोरदार मागणी केली आहे.

Someshwar Sugar Factory Election: शासकीय परिपत्रकाचा हवाला देत पलटवार

महाराष्ट्र शासनाच्या 15 जुलै 2026 च्या परिपत्रकाचा संदर्भ देत पुरुषोत्तम जगताप यांनी पत्रात नमूद केले आहे की, शासनाने अजित अनंतराव पवार यांचा समावेश 'राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या' अधिकृत यादीत केला आहे. त्यामुळे अशा लोकनेत्याचा फोटो निवडणुकीच्या प्रचारात (Election Campaign) वापरणे कोणत्याही दृष्टीने आक्षेपार्ह किंवा गैर ठरत नाही.

Someshwar Sugar Factory Election: बाळासाहेबांच्या फोटो वादाचे दिले उदाहरण

आपल्या युक्तिवादाचे समर्थन करताना जगताप यांनी शिवसेनेतील (Shiv Sena) राजकीय वादाचे उदाहरण दिले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पोस्टरवर वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो वापरण्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेला आक्षेप टिकू शकला नव्हता. कारण महापुरुष किंवा थोर व्यक्ती ही कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची वा व्यक्तीची खासगी मालमत्ता नसतात; तोच नियम इथेही लागू होतो, असा रोखठोक युक्तिवाद जगताप यांनी मांडला आहे.

Someshwar Sugar Factory Election: कोणत्या कायद्याखाली बंदी? स्पष्टीकरण द्या!

कारखान्याची निवडणूक ही राजकीय पक्षविरहित असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणत्या कलमाखाली फोटो वापरावर बंदी घातली आहे, याचे कायदेशीर स्पष्टीकरण द्यावे आणि आपल्या बंदीच्या आदेशाचा पुनर्विचार करून परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Someshwar Sugar Factory Election: जय पवारांच्या हरकतीनंतर बंदीचा निर्णय

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी घेतलेल्या हरकतीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पुरुषोत्तम जगताप यांनी थेट राज्य शासनाचेच परिपत्रक पुराव्यादाखल सादर केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि कोणता कायदेशीर मार्ग काढतात, याकडे संपूर्ण बारामती आणि सोमेश्वर कारखाना सभासदांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत