मित्रांनो, भारतातील इंटरनेट जगतात एक भयंकर फाइट सुरू होणार आहे! कारण आता सॅटेलाइट इंटरनेट भारतात येण्याची शक्यताय..
आणि या शर्यतीत थेट आमनेसामने आलेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि मुकेश अंबानी! आता हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात..

मस्क यांनी सरळ सांगून टाकलंय – भारतात जर Starlink चालवायचं असेल, तर रेट एकदम खिशाला परवडणारेच ठेवावे लागतील. मस्क यांच्या मते, जर भाव जास्त ठेवले, तर भारतीय ग्राहक ही सेवा घेणारच नाहीत! बाजारात कॉम्पिटिशन वाढली की शेवटी फायदा आपल्यासारख्या युजर्सचाच होणार, असंही ते म्हणाले.

पण जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळणाऱ्या भारतात मस्क यांना जिओला टक्कर देता येईल का? भारतात सध्या मोबाईल डेटाचा दर सुमारे ८ सेंट्स (म्हणजे ६-७ रुपये) प्रति जीबी आहे. जिओच्या यशामागे या स्वस्त डेटाचाच तर मुख्य हात होता! मस्क यांनीसुद्धा हे मान्य केलंय की Starlink आल्यावर जिओच्या कमाईवर थोडा फरक पडेल, पण जिओचा धंदा काही बंद होणार नाही.

आता या सॅटेलाइट इंटरनेटच्या रेसमध्ये कोण-कोण उतरलंय?

इलॉन मस्क यांची Starlink

मुकेश अंबानी यांची Jio Satcom

आणि भारती समूहाची Eutelsat OneWeb

या सगळ्यांना परवाने मिळालेत, फक्त शेवटच्या सिक्युरिटी मंजुरीची वाट पाहणं सुरू आहे. दुसरीकडे ॲमेझॉनचं Project Kuiper पण लाईनमध्ये उभं आहे.
नेटवर्कचा विचार केला तर जिओ १,६०० पेक्षा जास्त सॅटेलाइट्स आणि २३ ग्राउंड स्टेशन्स तयार करत आहे, तर मस्क यांच्याकडे आधीच ११,००० पेक्षा जास्त सॅटेलाइट्स अंतराळात तयार आहेत!

ही सगळी जुंपलीये ती जिओच्या १०६ अब्ज डॉलरच्या महा-IPO च्या अगदी तोंडावर! हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो

ही सगळी जुंपलीये ती जिओच्या १०६ अब्ज डॉलरच्या महा-IPO च्या अगदी तोंडावर! हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो