Supriya Sule On Maharashtra Drought: 'मंत्र्यांच्या गाड्या आडवा, शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याचीही माझी तयारी'; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट इशारा
1 month ago 6
ARTICLE AD
Supriya Sule On Maharashtra Drought: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या (Maharashtra Drought) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारने (State Government) 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये (Taluka) दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली. या निर्णयानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) विविध सवलती आणि उपाययोजनांचा लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दुष्काळ जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharadchandra Pawar) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका केली आहे. पंढरपूर येथे दुष्काळाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर सुप्रिया सुळे यांनी भाषणातून सरकारवर निशाणा साधला. पंढरपूरमधील दुष्काळ आक्रोश मोर्चाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.
Supriya Sule On Maharashtra Drought: ‘मंत्र्यांच्या गाड्या आडवा, शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याचीही माझी तयारी’
सुप्रिया सुळे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सध्या राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना मंत्री मात्र काजू-पिस्ते खाण्यात मग्न आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी रास्ता रोको करण्याबाबत तुम्ही सुचवत आहात, मात्र याचा त्रास सर्वसामान्यांना होतो. यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या आडवा. यानंतर पोलीस फार तर काय करतील, अटक करतील. पण हे मंत्री फक्त काजू-पिस्ते खाण्यात मग्न असतात. त्यामुळे त्यांच्या रस्त्यावरील गाड्या अडविल्यास शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याचीही माझी तयारी आहे,” असे त्यांनी म्हटले.
Supriya Sule On Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर झाल्याचे समजल्यावर आम्हाला आनंद झाला होता, मात्र...
सुप्रिया सुळे यांनी दुष्काळाच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करत सरकारने केवळ दुष्काळ जाहीर न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत देण्याची मागणी केली. “दुष्काळ जाहीर झाल्याचे समजल्यावर आम्हाला आनंद झाला होता. मात्र, यात कुठलीच ठोस उपाययोजना नसल्याने जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी आणि दुष्काळाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करेल,” असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.
Maharashtra Farmers: दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार?
जमीन महसुलात सूट
पीक कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट (7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स
शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश
आणखी वाचा
Raj Thackeray Gyanesh Kumar: राज ठाकरेंची मोठी घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा काढणार
Read Entire Article