Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट

2 months ago 7
ARTICLE AD
<p>Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट</p> <p>रक्षाबंधनाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानला जातो. याचदरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत अजित पवार &nbsp;यांच्याबाबत एक भावूक पोस्ट केली आहे. &nbsp;आज राखीपौर्णिमा... पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं... यावर आजही विश्वास बसत नाही.लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील...तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे!&nbsp;</p>
Read Entire Article