Suresh Dhas on Devendra Fadnavis: बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आयोजित फळबाग शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राजकीय विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळ (Drought) आणि मदतीचा उल्लेख करत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत विरोधकांच्या दौऱ्यांवर "ठाकरेंची जत्रा" असा जोरदार टोला लगावला.

Suresh Dhas on Devendra Fadnavis: 40-50 वर्षांची दादागिरी मोडून काढली

मेळाव्यात बोलताना सुरेश धस यांनी बीडमधील कथित 'आंतरराष्ट्रीय नेत्या'चा उल्लेख करत भूतकाळातील टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना "शहरी भागाचा मुख्यमंत्री" म्हटले होते आणि "गाय धुता येईल का?" अशी टीका केली होती, त्यांच्यावर धसांनी निशाणा साधला. "जिल्ह्यातील चाळीस-पन्नास वर्षांची दादागिरी मोडून काढण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे," असा दावा धस यांनी केला. तसेच संकटग्रस्त फळबागांसाठी हेक्टरी 6 लाख 55 हजार रुपयांची मदत देण्याची मागणीही त्यांनी यावेळी व्यासपीठावरून केली.

Suresh Dhas on Devendra Fadnavis: शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा हे देवेंद्र फडणवीस

सुरेश धस म्हणाले की, "विरोधी पक्षाचे लोक कशाला हिंडत आहेत सध्या? हिंडायची काय गरज आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तीन जिल्ह्यांचा चार दिवसांपूर्वी दौरा केला. सोलापूर, धाराशिव आणि लातूर. साहेबांनी लातूरला स्टेटमेंट केले की, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल. केलंय का नाही? मग परत जाऊन काय ठाकरेंची जत्रा... राज्याचे मुख्यमंत्री जर बोललेत ना तुम्हाला दसरा आणि दिवाळीच्या मध्ये अकाउंटवर पैसे येणार आहेत. हे राज्याचे मुख्यमंत्री बोलले. जे मुख्यमंत्री त्यांच्या कालावधीत दोनदा कर्जमाफी झाली, आता सुद्धा कर्जमाफी झाली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खरा जाणता राजा हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, असं मी जबाबदारीने बोलतोय," असे त्यांनी म्हटले.

Maharashtra Farmers: दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार?

* जमीन महसुलात सूट
* पीक कर्जाचे पुनर्गठन
* शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
* कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सूट
(7.5 हॉर्सपॉवर क्षमतेच्या वीजपंपांचे वीज बिल आधीच माफ, आता त्यावरील वीजपंपांनाही सूट)
* शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी
* रोजगार हमी योजना अंतर्गत नियमात शिथिलता आणून अधिकाधिक कामे सुरु करणार
* आवश्यक त्या ठिकाणी पिण्याचे टँकर्स
* टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित होणार नाही
* शेतीवर आश्रित शेतकरी/शेतमजूर यांना अन्नधान्य पुरवणार
* जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था करणार (Chara Chavni)
* जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणार
* पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाणी यासाठी आधीच्या आदेशाप्रमाणे नियोजन सुरुच ठेवणार
* पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश
* पिकांची स्थिती दाखवणारे छायाचित्र, जीपीएस संकलित करण्याचे आदेश

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Maharashtra Drought: मोठी बातमी: राज्यात दुष्काळ जाहीर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 मोठे लाभ मिळणार