Thane Crime Pradeep Purnekar Case: ठाण्याच्या (Thane) मानपाडा (Manpada) परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करून त्यांना संपवले. या धक्कादायक घटनेनंतर ठाणे पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Thane Crime Pradeep Purnekar Case: 9 विशेष पथकांकडून आरोपींचा शोध

घटनेनंतर ठाणे पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांनी मंगळवारी रात्रीच मारेकऱ्यांना पकडण्यासाठी तब्बल 9 विशेष पथकेतयार केली होती. यामध्ये गुन्हे खंडणी विभागाची 3 आणि इतर 5 पथकांचा समावेश असून, मुंबईसह बाहेरच्या परिसरात आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

Thane Crime Pradeep Purnekar Case: 100 हून अधिक CCTV ची तपासणी अन् साक्षीदारांचे जबाब

हत्येचा मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा सुगावा लावण्यासाठी पोलिसांनी घटनेच्या परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आहे. याशिवाय परिसरातील व्यावसायिक, दुकानदार आणि प्रत्यक्षदर्शींची कसून चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्णेकर यांच्या नातेवाईकांचे आणि जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात आले असून, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हत्येचा कट उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Thane Crime Pradeep Purnekar Case: तिघांना अटक, इतर आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आतापर्यंत पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक केली आहे. कोर्टाने आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय आरोपी पप्या शिंदेची दुचाकी आणि हत्येत वापरलेल्या इतर दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच हत्येपूर्वी पप्या शिंदे याच्या संपर्कात असलेल्या 3 महिला आणि 2 पुरुष अशा एकूण 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य संशयितांपैकी एक असलेला संतोष कनोजिया उर्फ 'टल्ली' याच्यासह आणखी एका संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.

Thane Crime Pradeep Purnekar Case: नेमकं प्रकरण काय?

प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा येथील गणेशनगरमधील त्यांच्या कार्यालयात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हत्येनंतर पूर्णेकर कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत, मारेकऱ्यांना पकडल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला होता. प्रदीप पूर्णेकर यांचे भाऊ जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे या हत्येच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा थेट आरोप केला. पोलिसांनी पुरवणी एफआयआरमध्ये या दोघांच्या नावांचा समावेश केल्यानंतरच कुटुंबीयांनी पूर्णेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Thane Crime Pradeep Purnekar death case: मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?