Thane Crime Sharmila Pimpalolkar: ठाण्याच्या (Thane News) महापौर शर्मिला पिंपलोळकर (Sharmila Pimpalolkar) यांच्या चालकाची मुजोरी पाहायला मिळाली आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) मुख्यालयाच्या समोरच महापौर शर्मिला पिंपलोळकर (Mayor Sharmila Pimpolkar) यांच्या चालकानं गुंडगिरी करत एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर यंना जबर मारहाण केलीय. महापौरांच्या ड्रायव्हरनं केलेल्या मारहाणीत एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे. चालक एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यानं कॅमेरामन विनय राजभर (Vinay Rajbhar) यांची थेट कॉलर पकडून मुजोरी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, नौपाडा पोलिसांनी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर यांचा चालक सुनील खरपडेला ताब्यात घेतलं आहे. पण, या गंभीर प्रकारानंतर महापौरांच्या चालकाची मुजोरी समोर आली असून, अत्यंत गंभीर कृत्य आहे.

गाडीची पार्किंग कुठे करायची यावरुन या वादाची ठिणगी पडली. ठाणे महापालिकेच्या आवातार एबीपी माझाची गाडी उभी होती, त्या ठिकाणी महापौकांचा चालक आला आणि त्यानं थेट शिवीगाळ करायचा सुरुवात केली. त्यावेळी तिथे एबीपी माझाच्या गाडीचा चालक आणि कॅमेरामन विनय राजभर होते. त्यांनी महापौरांच्या चालकाला शिवीगाळ का करताय? अशी विचारणा केली. पण, महापौरांच्या चालकाची मुजोरी एवढी की, त्यानं अत्यंत घृणास्पद कृत्य करत, थेट कॅमेरामन विनय राजभर यांना मारहाण करायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार ठाणे महापालिकेच्या गेटवरच घडला. तिथे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांनीही कोणताही हस्तक्षेप केला नाही.

एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांना महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या चालकाकडून झालेल्या मारहाणीचा विविध स्तरांतून निषेध नोंदवला जातोय. पत्रकारांना अशा प्रकारची मारहाण कोणीही खपून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ठाणे दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला आहे.

प्रकरण नेमकं काय?

पार्किंगच्या वादातून मारहाणीपर्यंत हा वाद गेल्याचं दिसून आलं, मारहाण करणाऱ्या चालकानं आधी शिवीगाळ केली, त्यामुळे एबीपी माझाचे कॅमेरामन विनय राजभर यांनी चालकाला जाब विचारला. त्यानंतर महापौरांच्या चालकानं मुजोरी करत थेट सुनील खरपडे यांना मारहाण केली.

संतापजनक प्रकारावर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांची प्रतिक्रिया...

घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी एबीपी माझाशी फोनवरुन संवाद साधला. महापौर शर्मिला पिंपलोळकर म्हणाल्या की, आताच मला घडलेला प्रकार समजला. ज्या पद्धतीनं व्हिडीओमध्ये दिसतंय, त्यावरुन मी प्रशासनाला सांगितलंय की, योग्य ती कारवाई त्यांच्यावर तातडीनं करावी. जेव्हा ही घटना घडली, त्यावेळी मी तिथे उपस्थित नव्हती. मी थोड्याच वेळात तिथे पोहोचतेय, सर्व माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. पण, तरीसुद्धा जो प्रकार घडलाय तो घडायलाच नव्हता पाहिजे, शब्दांची बाचाबाची झाली असेल, तिथपर्यंत ठीक आहे. पण, एखाद्याला मारहाण करणं, हा प्रकार अगदीच चुकीचा आहे. मग तो माझा चालक असला तरीही... आमचा कोणताही हेतू नसतो की, आमच्या चालकानं एखाद्या व्यक्तीला असं मारावं, मी कधीच अशा कृत्यांना पाठीशी घालणार नाही. त्यामुळे योग्य कारवाई करिन.

पाहा व्हिडीओ : Thane Mayor Driver : ठाण्याच्या महापौरांच्या ड्रायव्हरची एबीपी माझाच्या कॅमेरामनला मारहाण