Tiger Shroff :  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! जशास तसे उत्तर देऊ, हे करणाऱ्यांना ठेचून काढू : एकनाथ शिंदे

1 week ago 3
ARTICLE AD

Tiger Shroff :  मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क इथं धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) गाडीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. तर चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळं एकच खळबळजनक उडाली आहे. टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. याबाबतीत मुंबई पोलिसांशी चर्चा झालेली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी टीम तयार करुन फायरिंग करणाऱ्यांना शोधण्यासाठी पथक पाठवलेले आहे. त्यांना तात्काळ शोधून काढू. त्यांना जशास तसे उत्तर आम्ही देऊ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जे कोणी असे करतील, त्यांना त्यांच्या भाषेत ठेचून काढले जाईल

टायगर श्रॉफ यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांच्या वडिलांशी सुद्धा माझी चर्चा झाली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये चिंता करु नका, सरकार तुमच्या सोबत आहे. मुंबई पोलीस आणि सरकारने देखील ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. जे कोणी मुंबईमध्ये दहशत पसरवण्याचे, दादागिरी करण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचे काम करतील. त्यांना सोडले जाणार नाही. जे कोणी असे करतील, त्यांना त्यांच्या भाषेत ठेचून काढले जाईल असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

गाडीवर 7 राऊंड गोळीबार, मुंबई गुन्हे शाखेच पथक घटनास्थळावर दाखल

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मुंबई गुन्हे शाखेच पथक घटनास्थळावर दाखल झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे घटनास्थळाची पाहणी करायला आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, टायगरच्या गाडीवर 7 राऊंड गोळीबार झाला आहे. यामध्ये टायगर श्रॉफचा ड्रायव्हर आणि एक सिव्हिलियन जखमी झाला आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या टायगर श्रॉफवर अचानक गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात टायगर श्रॉफचा फॅन जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गोळीबारात उमेश चव्हाण नावाचा फॅन जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली

अभिनेता  टायगर श्रॉफच्या गाडीवर गोलीबार झाल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. जुहू पोलीस स्टेशन समोरच अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस स्टेशनच्या समोर असलेली गल्लीमध्ये सहा ते सात राउंड गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायगर श्रॉफला गोळी लागली नाही. टायगर सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.  हल्ल्यानंतर टायगरने स्वतः गाडी चालून दोघांना रुग्णालयात नेले आहे.

Read Entire Article