Torrent Power Karjat Project : कर्जतचा प्रकल्प हा पर्यावरणपूरकच, विरोधकांचे फेक नरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्रविरोधी धोरण; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

5 days ago 2
ARTICLE AD

मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत विरोधक आणि पर्यावरणप्रेमींनी सरकारवर निशाणा साधला होता. या वादावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया देत विरोधकांचा आरोप खोडून काढला आहे."कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा संपूर्णपणे पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प असून विरोधकांकडून केवळ फेक नरेटिव्ह (Fake Narrative) पसरवण्याचे काम सुरू आहे, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, खोटा नरेटिव्ह तयार करणे म्हणजे महाराष्ट्रविरोधी कृत्य आहे. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका नष्ट होणार नाही आणि जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांच्या पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल. हा संपूर्ण प्रकल्प कायद्याच्या चौकटीत राहूनच पूर्ण केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Devendra Fadnavis On Karjat Hydro Project : मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "समाजातील सर्व घटकांचा विचार करूनच या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, केवळ राजकीय स्वार्थापोटी या विकासात्मक प्रकल्पाला विरोध केला जात असेल, तर ते अत्यंत अयोग्य आहे."

Torrent Power Project Details : प्रकल्पाबाबत सरकारचा मोठा खुलासा

विरोधकांच्या आरोपांनंतर राज्य सरकारने या प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती समोर ठेवत खालील महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे:

महाराष्ट्राचा प्रकल्प: हा गुजरातचा प्रकल्प नसून महाराष्ट्राचा आहे. यातील गुंतवणूक, रोजगार आणि निर्माण होणारी वीज सर्वकाही महाराष्ट्रालाच मिळणार आहे.

वीज अन् गुंतवणूक: या प्रकल्पातून तब्बल 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून महाराष्ट्राला 12,000 मेगावॉट स्वच्छ वीज उपलब्ध होणार आहे.

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान: हा प्रकल्प कोळशावर आधारित नसून सौर ऊर्जेवर आधारित आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नसून हा प्रकल्प पर्यावरणाला पूरक ठरणार आहे.

पर्यायी वृक्षारोपण: प्रकल्पासाठी 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने कंपनीने आधीच वन विभागाला 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. तसेच या क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 आणि वन विभाग 30,000 अशी एकूण 90,000 नवी झाडे लावणार आहे.

अभयारण्यापासून दूर: हा प्रकल्प भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून 16 किमी आणि ज्योतिर्लिंग मंदिरापासून 20 किमी दूर आहे. हा सर्व भाग इको-सेन्सिटिव्ह झोनच्या (ESZ) बाहेर आहे.

प्रदूषण अन् पाण्याची बचत: या प्रकल्पामुळे वर्षाला 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन आणि 40 लाख वाहनांच्या कार्बन उत्सर्जनाइतके प्रदूषण टळणार आहे. तसेच दरवर्षी 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटरची बचत होणार आहे, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे असते.

ही बातमी वाचा:

Prataprao Jadhav: एकनाथ शिंदेंचा गळा इतका नाजूक नाही की कुणी केसाने कापेल; जे काही चाललंय ते चांगलं नाही; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल, भाजपलाही सुनावलं!

Read Entire Article