Tukaram Mundhe FDA Action In Pune मोठी बातमी: पुण्यात 4 ट्रक पनीर-खवा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA चा सर्वात मोठा दणका!

1 month ago 8
ARTICLE AD

Tukaram Mundhe FDA Action In Pune: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई (Tukaram Mundhe FDA Action In Pune) केली आहे. पुण्यातील बुधवार पेठ परिसरातून 4 ट्रक पनीर-खवा जप्त (paneer and khava seized in Pune) करण्यात आले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या या ॲक्शनने एकच खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या पथकाने पुण्यातील बुधवार पेठेत धडक कारवाई करत तब्बल चार ट्रक पनीर आणि खव्याचा साठा (Pune News) जप्त केला आहे. मोठ्या प्रमाणातील हा साठा पाहता कारवाईसाठी अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांची गुणवत्ता आणि साठ्याच्या स्त्रोताबाबत तपास सुरू आहे. गणेशोत्सवात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. (FDA Action In Budhwar Peth Pune)

नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई- (FDA Action In Nashik)

नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्टवर छापा टाकण्यात आला. अन्न पदार्थ मिसळयुक्त तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयातून तपासणी करण्यात आली. यामध्ये फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प, क्रीमरचा एकूण 6457 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त साठ्याची किंमत तब्बल 39 लाख 18 हजार 520 रुपये इतकी आहे. पदार्थांच्या लेबलवर Use by Date, Nutritional Information, Packing Date आणि FSSAI License Number आढळला नाही. त्यामुळे अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

महाप्रसाद वाटप करण्याच्या नियोजनाबाबत FDA कडून मार्गदर्शक सूचना जारी-

सणासुदीच्या काळात भंडारा महाप्रसाद वाटप करण्याच्या नियोजनाबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून (Tukaram Mundhe FDA) मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात कार्यक्रमापूर्वी किमान 7 दिवस अगोदर सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना घेण्यात यावी, अशी सूचना एफडीएकडून देण्यात आली आहे. सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रा, उरूस आदी प्रसंगी आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर, भंडारा व इतर सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांमध्ये अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्यामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. (Festival Bhandara Mahaprasad Food)

किमान 7 दिवस अगोदर पूर्वसूचना नमुना सादर करणे आवश्यक- (Tukaram Munde FDA On Mahaprasad)

परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर किंवा स्वयंपाकगृहामार्फत अशा कार्यक्रमांसाठी अन्न तयार व वितरित करण्यात येत असल्यास कार्यक्रमाच्या किमान 7 दिवस अगोदर पदनिर्देशित अधिकाऱ्यास विहित पूर्वसूचना नमुना सादर करणे आवश्यक राहील. अन्न व्यवसाय चालकांनी कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, सुरक्षित पाणी, योग्य तापमान नियंत्रण, कच्चे व शिजविलेले अन्न यांचे विभाजन, अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षित अन्न साठवणूक यांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.

गणेशोत्सवाआधी पुण्यात FDA ची मोठी कारवाई ,पुण्यात 4 ट्रक पनीर-खवा जप्त, VIDEO:

संबंधित बातमी:

Tukaram Mundhe: महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर; तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’

Read Entire Article