Tukaram Mundhe Marathi News: मी माझ्या मुलांना आयएएस न होण्याचा सल्ला देईन; तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून अनेकांना धक्का, नेमकं काय म्हणाले?

1 week ago 3
ARTICLE AD

Tukaram Mundhe Marathi News: सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दररोज भेसळयुक्त, अस्वच्छता असणाऱ्या हॉटेलवर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

माझ्या मुलांना मी आयएएस नको होऊ असा सल्ला देईन- तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Marathi News)

सात सेकंदांच्या आयुष्यात गुंतलेल्या तरुण पिढीला अर्थात झेनजीला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी तिखट सल्ला दिला. तरुणाईच्या बदलत्या या मानसिकतेवर मुंढेंनी सडेतोड प्रहार केला. तरुण पिढी ज्ञानी आहे, त्यांना माहितीचा साठा एका क्लिकवर उपलब्ध ही होतो, ते खूप वेगवान आहेत. पण त्यांना थांबायचं म्हटलं की त्रास होतो. त्यामुळं ते मर्यादित आहेत. त्यांचं 'अटेंशन स्पॅम, खूप कमी आहे. प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर सात सेकंदात मिळत नाही. पण तुमच्या आमच्या आजच्या समस्यांचं उत्तर मात्र त्या सेकंदात कधीचं मिळू शकत नाही. त्यामुळं यश कधीही घाईने किंवा काही क्षणात मिळत नसते, त्यासाठी चिकाटी आणि सातत्याची गरज असते. तरुणांच्या भविष्यासाठी मुंढेंनी तिखट सल्ला दिला. मी या पिढीसाठी काही करायचं ठरवलं तर मी सांगेन की कॅरॅक्टर बिल्टअप करा, असा मोलाचा सल्ला दिला. तसेचं माझ्या मुलांनी मला आयएएस होऊ का? असं विचारलं तर मी त्यांना आयएएस होऊ नका, असं म्हणेन. तुकाराम मुंढेंचे हे उत्तर ऐकून अनेकांना धक्का बसला. पिंपरी चिंचवडमध्ये ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये तुकाराम मुंढे बोलत होते

दुष्काळात संधी शोधा, तुकाराम मुंढे दुष्काळाबाबत काय म्हणाले? (Tukaram Mundhe News)

दुष्काळाकडे केवळ समस्या म्हणून पाहू नका, तर त्यात संधी शोधा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो'मध्ये बोलताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता दुग्ध व्यवसायासारख्या पूरक व्यवसायांना प्राधान्य दिले पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. सोबतच, हा दुष्काळ नेमका का पडला? याची कारणे आणि त्यावरील उपायांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहनही त्यांनी केले. संकटात खचून न जाता भविष्याचा विचार करून व्यवसायाचे नवे मार्ग शोधा असं आवाहन ही तुकाराम मुंढेंनी केलं.

तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

Tukaram Mundhe : 7 सेकंदांच्या स्क्रोलिंगमध्ये अडकलेल्या तरुणाईला तुकाराम मुंढेंचा तिखट सल्ला; यशासाठी दिला 'हा' मास्टर प्लॅन!

Read Entire Article