Tukaram Mundhe On Preity Zinta Mallika Sherawat: 'केवळ टी-शर्ट घालणं...', तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडून मिळणाऱ्या पाठिंब्यावर पहिल्यांदाच बोलले, प्रीति झिंटा- मल्लिका शेरावतचं नाव घेत म्हणाले...

1 month ago 6
ARTICLE AD

Tukaram Mundhe On Preity Zinta Mallika Sherawat: आपल्या धडक कारवायांनी अवघा महाराष्ट्र हादरवणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त (FDA Commissioner) तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सध्या भलतेच चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या तात्काळ कारवायांमुळे हॉटेल चालक, दूध डेअऱ्या, अन्न पदार्थांच्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. कित्येक भेसळयुक्त पदार्थ तुकाराम मुंढे यांनी जप्त करुन नष्ट केले आहेत. आपल्या प्रामाणिक आणि थेट कारवायांमुळे सर्वसामान्यांच्या मनात तुकाराम मुंढे (FDA Commissioner Tukaram Mundhe) यांनी आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. फक्त सर्वसामान्यच नाहीतर कित्येक सेलिब्रिटीही तुकाराम मुंढे यांचे फॅन्स झालेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी मोहिमांना पाठिंबा दिलाय. सलमान खान, मनोज बाजपेयी आणि ट्विंकल खन्ना यांच्यासह बॉलिवूडमधील इतर अनेक कलाकारांनी त्यांच्या कठोर अंमलबजावणीचं कौतुक केलेलं.

काही दिवसांपूर्वी प्रीति झिंटा 'टीम तुकाराम मुंढे', असं लिहिलेलं टी-शर्ट फ्लॉन्ट करताना दिसलेली. तर, मल्लिका शेरावतनं एक व्हिडीओ शेअर करुन तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला. आता, तुकाराम मुंढेंनी एका मुलाखतीत बोलताना प्रीति झिंटा आणि मल्लिका शेरावत यांनी केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिलीय.

तुकाराम मुंढे प्रिती झिंटाच्या 'टीम तुकाराम मुंढे' लिहिलेल्या टी-शर्टवर काय म्हणाले? (Tukaram Mundhe On  Team Tukaram Mundhe Tshirt)

'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी मोहिमेला बॉलिवूड कलाकारांचा पाठिंबा मिळतोय. या समर्थनाचं स्वागत करतानाच, तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना केवळ सोशल मीडियापुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृती करण्याचं आवाहन केलंय.

तुकाराम मुंढे यांनी बोलताना सर्व कलाकारांचे आभार मानले. पण, त्याचवेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. "केवळ टी-शर्ट घालणं किंवा सोशल मीडियावर कौतुक करणं पुरेसं नाही, तर समाजात खऱ्या अर्थानं बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष काम आणि योग्य मानसिकतेची गरज आहे...", असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय.

प्रिती झिंटानं अलीकडेच 'टीम तुकाराम मुंडे' असं लिहिलेला काळा टी-शर्ट फ्लॉन्ट करताना दिसलेली. यावर प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले, "नाही, मी प्रीति झिंटा यांच्याशी वैयक्तिकरित्या किंवा फोनवरही बोललेलो नाही. पण त्यांनी 'टीम तुकाराम मुंडे'चा उल्लेख केला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे... फक्त 'Team Tukaram Mundhe' असा टी-शर्ट घालणं पुरेसं नाही. केवळ नाव किंवा शीर्षक दाखवून उपयोग नाही, प्रत्यक्ष काम झालं पाहिजे आणि योग्य विचारसरणी स्वीकारली पाहिजे..."

तुकाराम मुंढे मल्लिका शेरावतनं दिलेल्या पाठिंब्यावर काय म्हणाले?

मल्लिका शेरावतनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इडली आणि चटणी खाताना तुकाराम मुंढेंचं कौतुक केलेलं. हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषेत बोलताना तिनं, "आप की वजह से अब मैं शांती से खाना खा सकती हूं... आपकी नजरों से कुछ बचता नहीं...", असं म्हणत व्हिडीओ शेअर केलेला. त्यावरही तुकाराम मुंढे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, "मी माझ्या परीनं काम करतोय आणि माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, हे केवळ एका व्यक्तीचं काम नाही, हा टीमचा प्रयत्न आहे...", असं त्यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tukaram Mundhe On Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन; आता तुकाराम मुंढेंनीही दिला सेलिब्रेटींना इशारा, नेमकं काय म्हणाले?

Read Entire Article