Uddhav Thackeray on Disha Salian Case: आदित्य ठाकरेंनंतर आता दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरेही बोलले, म्हणाले, 'फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा आम्हीही...'

1 month ago 5
ARTICLE AD

Uddhav Thackeray on Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला (Disha Salian Case) आता पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांच्या जबाबाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या एफआयआरमध्ये अनेक व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असून, त्यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh), सचिन वाझे (Sachin Waze), अभिनेता सूरज पांचोली (Sooraj Pancholi), दिनो मोरिया (Dino Morea) आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांच्यासह इतरांची नावे असल्याचे वृत्त आहे. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray on Disha Salian Case: नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझेही नाव आहे. तुमचेही येईल. दुरान्वयेही संबंध नाही. ओळख पाळख नाही. किती काळ सहन करत राहणार. नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव येईल. का म्हणून नाव घेतले जातंय. राजकीय हेतूने हे प्रेरित आहे. आम्ही गप्प होतो. फालतू चारित्र्यहनन बस्स झाले, अन्यथा आम्हीही कायदेशीर मार्गाने जावू. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Uddhav Thackeray on Disha Salian Case: आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो! मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे. कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

आणखी वाचा

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल

Read Entire Article