<p>Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी</p>
<p>माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आलेल्या आठवणींना उजाळा दिला. 'रीडिंग इन बिटवीन लाईन्स' म्हणजेच रेषांमधील गूढ अर्थ समजावून सांगत त्यांनी 'फटकारे' पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. समाजात निर्माण होणाऱ्या विसंगतीवर व्यंगचित्रकार अचूक बोट ठेवतो, असे सांगत सरकारने उभारणाऱ्या व्यंगचित्रकारांच्या कला दालनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.या ऐतिहासिक सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि संपादक प्रशांत कुलकर्णी हे मान्यवर विशेष उपस्थित होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढताना रेषांचे महत्त्व, अचूक टिपण आणि स्वाभिमान कसा टिकवून ठेवावा, यावर मार्गदर्शन केले. जुन्या काळातील व्यंगचित्र विश्वातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, "संस्कृती आणि कलेच्या व्यासपीठावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही महाराष्ट्राची जुनी आणि प्रगल्भ परंपरा आहे."</p>