V. Radha on MPSC Exam Reforms: एमपीएससीबद्दल (MPSC Exam) उमेदवारांच्या मनात निश्चितच विश्वासाची कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, संस्थेचे बळकटीकरणकरून आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करू, असे मत परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा (V. Radha) यांनी व्यक्त केले आहे. एमपीएससीचा आकृतीबंध वाढवून अधिक कर्मचारी आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय. तसेच, एमपीएससीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाकडून रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्ही राधा परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणांसाठी काय केले पाहिजे, याचा काल (16 सप्टेंबर) नागपुरात प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. (V. Radha on MPSC Exam Reforms)

V. Radha: MPSCच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाकडून रोडमॅप तयार करण्यात येणार

एमपीएससीचा आकृतीबंध वाढवून अधिक कर्मचारी देण्याची गरज आहे. एमपीएससीची स्वतःची इमारत तयार होत असून, संस्थेला सुरक्षित आणि आवश्यक संसाधने देणे गरजेचे आहे. यूपीएससीदेखील परीक्षा आयोजित करते, त्यामुळे परीक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा विचार आवश्यक असल्याचेही एमपीएससीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी शासनाकडून रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्ही राधा यांनी सांगितलंय.

भ्रष्ट कारभाराबाबत झिरो टॉलरन्स, दोषींवर कारवाई होणे आवश्यक (V. Radha on MPSC Exam Reforms)

निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणेच्या मदतीने निवडणुका घेतो, त्याचप्रमाणे एमपीएससीला प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात स्वतंत्र कर्मचारी असणे आवश्यक नाही. एमपीएससी ही घटनात्मक संस्था असून, यापूर्वीही तिने व्यवस्थित काम करून दाखवले आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी शासन एमपीएससीला रोडमॅप देणार. एमपीएससीमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. भ्रष्ट कारभाराबाबत झिरो टॉलरन्स असायला हवे. यासह दोषींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही व्ही राधा म्हणाल्या. परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि दोषींवरील कारवाई या दोन स्वतंत्र बाबी असल्याचेसांगत परीक्षा पद्धतीत सुधारण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुख आणि राज्य सरकारच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी सांगितलंय.

इतर महत्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?