Vidyanand Bapat Pune Marathi News: पुण्यातील विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. (Vidyanand Bapat Pune Marathi News)

पुणे महापालिकेच्या गणेशोत्सवपूर्व बैठकीत विद्याधर बापट यांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला विरोध केला. विद्याधर बापट यांनी गणेशोत्सवाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, उत्सव साजरा करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी भूमिका मांडली. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका, लाऊडस्पीकर आणि डीजेमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांवर होणारा परिणाम विद्याधर बापट यांनी बैठकीत मांडला. मुख्य रस्ते बंद करून मोठ्या मिरवणुका काढल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो, त्यामुळे उत्सवाच्या पद्धतीत कालसुसंगत बदल करण्याची गरज असल्याचेही विद्यानंद बापट यांनी सांगितले. तसेच विद्यानंद बापट यांच्या अस्खलित मराठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. (Vidyanand Bapat Pune DJ)

कोण आहेत पुण्यातील विद्यानंद बापट? (Who is Vidyanand Bapat Pune Marathi News?)

विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट हे 37 वर्षीय असून ते बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचं बहुतांश काम हे घरातूनच सुरू असतं. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.

विद्यानंद बापट यांच्या एका श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा- (Pune Vidyanand Bapat Marathi News)

विद्यानंद बापट यांच्या एका श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्...असं विद्यानंद बापट म्हणाले. या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत. या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे, असा आहे.

विद्यानंद बापटांना शरद केळकरांची साथ- (Pune DJ Marathi News)

पुण्यातील ऐतिहासिक गणेशोत्सवातील डीजे (DJ) आणि कर्णकर्कश ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. डीजेच्या दणदणाटाविरोधात आतापर्यंत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने लढा देत असताना, आता आणखी एका पुणेकराने या गंभीर प्रश्नावर थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) दरवाजे ठोठावले आहेत. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वाद, विद्यानंद बापटांचे काय चुकले?, VIDEO:

संबंधित बातमी:

विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले