Virat Kohli meets Eknath Shinde in London : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) शुक्रवारी लंडनमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांमध्ये क्रीडा, पायाभूत सुविधा आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी एएनआयशी बोलताना विराट कोहलीचं कौतुक केलं. एवढा मोठा क्रिकेटपटू असूनही विराट अतिशय साधा आणि जमिनीवर पाय असलेला व्यक्ती असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे विराट कोहलीबद्दल काय म्हणाले? (Eknath Shinde on Virat Kohli)

एकनाथ शिंदे म्हणाले, "विराट कोहली लंडनमध्ये राहतो. मी लंडनमध्ये असल्याचं त्याला कळल्यानंतर तो मला भेटायला आला. एवढा मोठा भारतीय क्रिकेटपटू, सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू असूनही तो किती साधा आहे, हे पाहून मला आनंद झाला. आमची यापूर्वीही भेट झाली आहे, मात्र आज त्याच्याशी झालेली थेट चर्चा विशेष चांगली होती." यावेळी महाराष्ट्रातील विविध कल्याणकारी योजनांची माहितीही विराटला दिल्याचं शिंदे यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावरही दोघांमध्ये चर्चा झाली.

Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde with Virat Kohli in London. 🇮🇳 [ANI] pic.twitter.com/QHmkycl1M9

— Johns. (@CricCrazyJohns) September 11, 2026

शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांतील विकासाबाबत विराट कोहलीनेही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. थर्ड मुंबई प्रकल्प, अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांबाबत यावेळी चर्चा झाली. या भेटीत केवळ क्रिकेट किंवा राजकारणावरच चर्चा झाली नाही, तर नव्या पिढीला स्पर्धांमध्ये पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्यातील प्रतिभेला योग्य व्यासपीठ देण्यासाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. यासंदर्भात विराटने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

#WATCH | London: Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, "Virat Kohli lives in London, and when he learned that I am here, he met me for a goodwill visit. I was delighted that such a big Indian cricketer, the one with the most centuries, is so down-to-earth. We had met before,… https://t.co/lzNbcdWo7n pic.twitter.com/ajmA69DOiY

— ANI (@ANI) September 11, 2026

100 शतकांच्या विक्रमाकडे विराटची वाटचाल

दरम्यान, विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील 100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर 100 शतकांचा टप्पा गाठणारा तो दुसरा क्रिकेटपटू ठरू शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत विराटला आणखी तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. सध्या त्याच्या नावावर एकूण 85 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत. या वर्षी वनडेमध्ये विराटने सहा डावांत 384 धावा केल्या असून त्याची फलंदाजीची सरासरी 64 आहे. इंग्लंडविरुद्ध ऑगस्टमध्ये झालेल्या वनडे मालिकेत त्याने तीन डावांत 144 धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर सध्या 14,941 धावा आहेत. 314 सामन्यांतील 302 डावांत त्याने 54 शतकं आणि 79 अर्धशतकं झळकावली आहेत. आता वनडेमध्ये 15 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी विराटला अवघ्या 59 धावांची गरज आहे.

हे ही वाचा -

Pakistan Cricket News : आधी फोन जप्त केले, आता सायबर क्राईमकडून रिझवान-इमामची चौकशी! पाकिस्तानात खळबळ, इंग्लंडमध्ये झाली मॅच फिक्सिंग?