Vishakha Raut: मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) नेत्या विशाखा राऊत (Vishakha Raut) यांना मोठा धक्का बसला आहे. जात प्रमाणपत्र (Caste Certificate) अवैध ठरल्याच्या प्रकरणात त्यांचे नगरसेवकपद (Corporator Post) रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department) शुक्रवारी जारी केली. आता येत्या सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची औपचारिक घोषणा होणार आहे. विशाखा राऊत या मुंबई महापालिकेतील अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांचे पद रद्द होणे हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने (Caste Certificate Verification Committee) अवैध ठरवले होते. या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवकपदावरही अपात्रतेची टांगती तलवार होती. समितीच्या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून राऊत यांच्याविरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रक्रियेला राऊत यांनी उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिले होते. न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होणार हे निश्चित झाले होते. केवळ महापालिकेच्या सभागृहात त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी होते. त्याआधीच नगरविकास विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

Vishakha Raut: सोमवारी महासभेत होणार घोषणा

मुंबई महानगरपालिकेची महासभा सोमवारी (दि. 07) होणार आहे. या सभेत विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा होणार आहे. महापालिकेच्या चिटणीस विभागाकडून (Municipal Secretary Department) त्यासाठी तयारी करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी मुंबई महापालिकेतील चार नगरसेवकांचे पद रद्द झाल्याची घोषणा सभागृहात करण्यात आली आहे. आता विशाखा राऊत यांच्या नावाचीही घोषणा झाल्यास जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे नगरसेवकपद गमावणाऱ्या नगरसेवकांची संख्या पाच होणार आहे.

Vishakha Raut: दादरच्या प्रभाग क्रमांक 191 मधून मिळवला होता विजय

विशाखा राऊत या दादरमधील प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या. सिद्धिविनायक मंदिर, शिवाजी पार्क आणि दादर पश्चिम या परिसराचा त्यांच्या प्रभागात समावेश होतो. 2026 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) त्यांनी नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. मात्र, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 16 नुसार त्या नगरसेवकपदासाठी अपात्र ठरल्या आहेत.

Vishakha Raut: सहा वर्षांसाठी अपात्र

सरकारच्या अधिसूचनेनुसार, विशाखा राऊत यांना 20 ऑगस्ट 2026 पासून सहा वर्षांच्या कालावधीसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास किंवा नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदाची जागा रिक्त झाल्याचे राजपत्रात नमूद करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे यापूर्वी मुंबई महापालिकेच्या 227 पैकी चार नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. एमआयएमच्या रोशन शेख व शमीर पटेल, ठाकरे गटाचे दीपक सावंत आणि राष्ट्रवादीच्या बुशरा मलिक यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. विशाखा राऊत यांचे पद रद्दची घोषणा झाल्यानंतर ही संख्या पाचवर पोहोचणार आहे.

Vishakha Raut: राऊत यांच्या प्रकरणात अधिसूचनेमुळे चर्चा

विशेष म्हणजे, यापूर्वीच्या चार नगरसेवकांचे पद रद्द करताना नगरविकास विभागाने अशा प्रकारची अधिसूचना काढली नव्हती. मात्र, विशाखा राऊत यांच्या प्रकरणात नगरविकास विभागाने स्वतंत्र अधिसूचना जारी केल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Palghar Crime News: शिंदे गटात आणखी एक ‘रमेश म्हात्रे’, पालघरमध्ये हॉस्पिटल कर्मचाऱ्याला मारहाण; जखमी गोविंदांच्या बिलावरून वाद झाला अन्...; नेमकं काय घडलं?