Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यामधील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन (MPSC Protest) गाजवणारा कोल्हापूरचा विवेकानंद पाटील (Vivekanand Patil ) काल रात्री मूळ गावी माजगाव येथे परतला. विवेकानंद पाटील मूळ गावी परतल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. कोल्हापूर जिल्ह्यातील माजगाव हे विवेकानंद यांचे मूळ गाव आहे. पुण्यातील आंदोलनादरम्यान विवेकानंद यांनी केलेल्या भाषणांमुळे तो संपूर्ण राज्यभर चर्चेत आला. आज त्याचे मूळ गावी गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी विवेकानंद देखील गावकऱ्यांच्या प्रेमामुळे भारावून गेल्याचे दिसून आले. तसेच माजगावमध्ये देखील विवेकानंद पाटील याने जोरदार भाषण केलं.

विवेकानंद पाटीलला राज ठाकरेंचा फोन; काय म्हणाले? (Vivekanand Patil On Raj Thackeray)

एमपीएससीच्या आंदोलनादरम्यान भाषणामुळे माझं अनेक जणांनी कौतुक केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे माझ्यासोबत होते. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील सतत संपर्कात होते. आदित्य ठाकरे देखील वारंवार फोन करुन विचारपूस करत होते. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांचाही मला आता फोन आला होता. लढ्याला यश मिळालं. आता मुंबईला येऊन भेटून जा...असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता मी पुन्हा मुंबईसाठी जाणार आहे, अशी माहिती विवेकानंद पाटीलने दिली. दरम्यान, राज ठाकरेंनी एमपीएससी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. यानंतर संबंधित प्रश्नावर राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले होते. या भेटीनंतर पुढील दोन दिवसांत तुम्हाला चांगली बातमी मिळेल, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली होती. त्यानंतर पुढील दोन दिवासांत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सरकारने रजेवर पाठवले

MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? (Which mpsc students demands have been accepted?)

आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह,पण सरकारनं चौकशी समिती नेमली

चौकशी होईपर्यंत अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर

भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ

दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर

एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार

आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्याचं आश्वासन

तीन वर्षात 70 हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन

2027 मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार

मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही

तहसिलदार भरतीत 60-40 ऐवजी 50-50 चा रेश्यो

आयोगाची सदस्य संख्या 11 पर्यंत वाढवली जाणार

एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार

पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर- (MPSC Vivek Bhimanwar)

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे 11-12 दिवसांचे आंदोलन (MPSC Protest) अखेर 12 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री स्थगित करण्यात आले आहे. सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे आणि चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांकून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना (Vivek Bhimanwar) रजेवर पाठवले आहे. तसेच MPSC प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची निवड करण्यात आली आहे.

विवेकानंद गावात परतला! माजगावकरांकडून जंगी स्वागत, VIDEO:

संबंधित बातमी:

Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...