अजित पअजित पवार पुतळावार पुतळा

1 week ago 2
ARTICLE AD
(अजित पवार यांचा संग्रहित फोटो वापरावा) -------- अजित पवारांच्या पुतळ्याचे ‘जेडीसीसी’त रविवारी अनावरण --- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता. २५) दुपारी बाराला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (जेडीसीसी) होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षस्थानी असतील, तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख या वेळी उपस्थित होते. अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले, की कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रित केले आहे. मात्र, त्यांचा दौरा निश्चित झालेला नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन प्रमुख पाहुणे राहतील. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व बँकेच्या संचालकांनाही निमंत्रित केले आहे. पुतळा अनावरणानंतर महाबळ कॉलनीतील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मान्यवरांची भाषणे होतील.
Read Entire Article