आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन - ''एआय''चा शिरकाव, तरी ''ॲनिमेशन''मध्ये कल्‍पकतेला वाव

3 days ago 2
ARTICLE AD
पान तीन ---------------------- लोगोः आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन --- ''एआय''चा शिरकाव, तरी ''ॲनिमेशन''मध्ये कल्‍पकतेला वाव नाशिकसह महाराष्ट्रात युवकांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ः कधीकाळी केवळ लहान मुलांच्या कार्टून्सपुरते मर्यादित मानले गेलेले ॲनिमेशन क्षेत्र आज जागतिक डिजिटल अर्थव्यवस्थेचा आणि सर्जनशील जगताचा आधारस्तंभ बनले आहे. इतर विविध क्षेत्रांप्रमाणे ॲनिमेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) ने शिरकाव केला आहे. परंतु, या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून घेत प्रभावी निर्मिती करण्यात कल्पकतेला भरपूर वाव असल्‍याचे तज्‍ज्ञांचे मत आहे. म्‍हणूनच आजही करिअरच्‍या नव्‍या संधी या क्षेत्रातून निर्माण होत आहेत. जगभरात २८ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा केला जातो. यानिमित्त या क्षेत्रातील व्‍यापकता, करिअर संधींची माहिती दिली जाते आहे. सध्या ॲनिमेशन क्षेत्रात सर्वांत मोठी तांत्रिक उलथापालथ आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स घडवून आणत आहे. पूर्वी लघुपटाच्या किंवा सिक्वेन्सच्या ॲनिमेशनसाठी शेकडो कलाकारांना काही आठवडे ते महिने लागायचे, ते काम आता प्रगत टेक्स्ट-टू-व्हिडिओ मॉडेल्स, रिअल-टाइम रेंडरिंग इंजिन्स आणि एआय टूल्समुळे काही तासांत साध्य होत आहे. एआयमुळे तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी कथेतील मानवी भावना, दिग्दर्शकीय दृष्टी आणि कलात्मक परिपक्वतेसाठी मूळ कलाकारांची गरज कायम आहे. ---- २५ अब्ज डॉलर्सचे लक्ष्य विविध उद्योग अहवाल आणि राष्ट्रीय धोरण आराखड्यानुसार, भारतीय ॲनिमेशन व व्हीएफएक्स बाजारपेठ दरवर्षी ३० ते ३५ टक्क्यांहून अधिक वेगाने विस्तारतो आहे. पुढील काही वर्षांत बाजारपेठ सुमारे २५ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या टास्क फोर्सच्या उद्दिष्टानुसार, २०३० पर्यंत या क्षेत्रात देशभरात २० लाखांहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे क्षेत्र आता केवळ सिनेमा किंवा दूरचित्रवाणीपुरते मर्यादित नसून गेमिंग, व्हर्च्युअल रिॲलिटी, वैद्यकीय थ्री-डी सिम्युलेशन, ऑटोमोबाईल डिझाइन, आर्किटेक्चरल व्हिज्युअलायझेशन आणि एडटेकमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगात येत आहे. --- मंत्रिमंडळाकडून आराखड्याला मंजूरी राज्‍य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या विशेष एव्‍हीजीसी-एक्‍सआर धोरणांतर्गत ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आर्थिक आराखडा मंजूर केला आहे. राज्याच्या ॲनिमेशन आणि गेमिंग क्षेत्राची उलाढाल २५ हजार कोटींवरून थेट ६५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आणि देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्‍या उद्दिष्टाने आराखडा तयार केला आहे. मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) आणि सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांना थेट जागतिक मानकांनुसार शिक्षण उपलब्ध होत आहे. --- नाशिकमध्ये ''क्रिएटिव्ह क्लस्टर'' राज्याच्या अधिकृत धोरणात मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिकला संभाव्य रिजनल ॲनिमेशन व गेमिंग क्लस्टर म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. हाय-स्पीड इंटरनेट आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमुळे नाशिकमधील युवक घरबसल्या हॉलिवूड, युरोप आणि बॉलिवूडच्या मोठ्या प्रकल्पांसाठी ३ डी मॉडेलिंग आणि व्हीएफएक्स कंपोझिटिंगचे काम करून उत्तम उत्पन्न मिळवत आहेत.
Read Entire Article