एक कोट २३ लाखांच्या फसवणुकीत संशयीताला कोठडी

6 days ago 3
ARTICLE AD
33489 दिपेश रूपानी ------------ दिपेश रुपानीच्या फसवणुकीचा आवाका वाढला महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही घातला अनेकांना गंडा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : हर्बल लाइफ कंपनीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोघांची १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांमध्ये फसवणूक करणाऱ्या दिपेश कमलेश रूपानी (रा. गणपती नगर, जळ‌गाव) याला सोमवारपर्यंत (ता. २६) वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दाखल गुन्ह्याव्यतिरिक्त त्याने जळगावातील इतरही २ जणांची १२ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले. फसवणूक केल्याप्रकरणी दीड वर्षांपासून पसार असलेल्या दिपेश रूपानी याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. १९) अटक केली होती. सुरुवातीला त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीदरम्यान त्याच्या चौकशीतून अनेक मुद्दे समोर येत आहेत. नागरिकांना गुंतवणूक करण्याचे सांगत त्याने त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावरही रक्कम स्वीकारली. या बँक खात्यांचा पोलिस पथकाकडून तपास सुरू आहे. पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (ता. २३) संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ----------- महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात गंडा दिपेश याला अटक केल्यानंतर फसवणूक झालेले इतर जणही पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये जळगावातील दोन जणांनी आर्थिक गुन्हे शाखेत जाऊन फसवणुकीची माहिती दिली. त्यानुसार या दोघांची प्रत्येकी ६ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. या सोबतच मध्य प्रदेशातील बालाघाट येेथे ही त्याने असाच गंडा घातला असून, तेथील नागरिक जळगाव आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधत आहेत. तसेच अकोला व अमरावती येथीलही नागरिकांची फसवणूक झाली असून अमरावती पोलिस आयुक्त क्षेत्रातील सीटी कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून तेथील पोलिसही २ वर्षांपासून त्याच्या मागावर आहेत. त्यामुळे अमरावती पोलिस न्यायालयाची परवानगी घेऊन दिपेशचा ताबा घेणार आहेत.
Read Entire Article