एमआयएमतर्फे महासभेत गदारोळ; महासभा सुरु होण्यापुर्वीच तहकूब

1 day ago 2
ARTICLE AD
MLN26B16179 मालेगाव : महासभेत आंदोलन करताना एमआयएमचे नगरसेवक. ----------------------- आयुक्त लाचप्रकरणी अडकल्याने महासभा रद्द ------------ मालेगावात एमआयएमतर्फे निषेधाच्या घोषणा ः आयुक्तांचे नाव रस्त्याला देण्याची गरज काय? सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २९ : येथील महापालिकेची नियोजित महासभा गुरुवारी (ता.२९) असतानाच आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक नीलेश पाटील, हिशेब विभागाचे प्रमुख हरीश डिंबर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. महासभेपूर्वी ‘एमआयएम’तर्फे नगरसेवकांनी हाताच्या दंडावर काळ्या फिती बांधून ‘चोर चोर- भाई भाई’ अशा घोषणा दिल्या. महासभा सुरु होण्यापूर्वीच तहकूब करण्यात आली. येथे गुरुवारी (ता. २९) आयुक्तांसह त्यांच्या सहकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली. सायंकाळी चारला येथे सातवी महासभा होणार होती. मात्र आयुक्त कारवाईत सापडल्याने महासभा रद्द करावी लागली. तत्पूर्वी एमआयएमच्या काही नगरसेवकांनी महापालिकेतच चोर चोर भाई भाई, एक चोराला वाचविण्यासाठी महासभा तहकूब केली जाते. आयुक्त रवींद्र जाधव हे धुळे येथे असताना देखील लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. दरेगाव येथील नगरसेवक उद्धव दरेकर यांच्या सूचनेनुसार नवापुरा वार्डातील सर्वे क्रमांक १२९ येथे मिल्लत मदरसा ते आग्रा रोडपर्यंत असलेल्या रस्त्याला आयुक्त रवींद्र जाधव मार्ग असे नामकरण करण्यात येणार होते. याच भागात मौलाना उमरेन रहेमानी व इतर मौलानांची देखील घरे आहेत. तरी देखील त्या रस्त्याला आयुक्त जाधव यांचे नाव देण्याचे कारण काय? त्यांनी शहरात अशी कोणती कामे केले ती दाखवावीत. त्यांचे या भूमीशी कोणते नाते आहे असा प्रश्‍न देखील उपस्थित केला. यावेळी नगरसेवक सिकंदर पहिलवान, रिजवाना शेख, कलीम दिलावर आदी उपस्थित होते. ---------------
Read Entire Article