एसएमबीटी हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

6 days ago 3
ARTICLE AD
जाहिरात विभाग/ मा. संपादकसो. सूचनेनुसार एमबीटीमध्ये गर्भवतींची प्रसूती, सोनोग्राफी मोफत दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; शून्य ते १६ वर्षांच्या बालकांनाही मोफत उपचार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२४ : ग्रामीण भागातील गरजू महिलांना दिलासा देण्यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने गर्भवतींची सामान्य व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती तसेच चार सोनोग्राफी तपासण्या मोफत केल्या जात आहेत. माता व बालमृत्यू रोखणे आणि सुरक्षित मातृत्वाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हॉस्पिटलच्या माहितीनुसार, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक महिलांनी प्रसूतिपूर्व आरोग्यसेवेचा लाभ घेतला असून, १८ हजारांहून अधिक सोनोग्राफी तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत. दोन हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध मोफत सुविधांचा थेट लाभ मिळाला आहे. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत महिलांना आहार, व्यायाम, गर्भाची वाढ, उच्च जोखमीची गर्भधारणा, रक्ताल्पता प्रतिबंध आणि नवजात बालकांची काळजी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून डोहाळे जेवणाचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. ग्रामीण भागातील गरजू महिलांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी आरोग्यमित्र कार्यरत आहेत. महिलांना वेळेवर तपासणी आणि उपचार मिळावेत, यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचारांचा खर्च कमी करण्यास मदत होत आहे. कोट जन्मापासून १६ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठीही विविध आजारांवरील उपचार, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्यसेवा मोफत उपलब्ध आहेत. - सचिन बोरसे, संचालक, एसएमबीटी आरोग्यसेवा डोहाळे जेवणातून आरोग्यजागृतीसोबतच वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये रुग्णांप्रति संवेदनशीलता आणि माणुसकीची भावना रुजवली जात आहे. - डॉ. किरण राजोळे, स्त्रीरोग विभागप्रमुख NSK26H33480 नाशिक : एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित डोहाळे उपक्रमात सहभागी महिला.
Read Entire Article