ऑक्‍टोबर हिटचा तडाखा कायम

1 week ago 2
ARTICLE AD
‘ऑक्‍टोबर हीट’चा तडाखा कायम कमाल तापमान ३५ अंशाजवळ, सायंकाळनंतर गार वारा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : परतीच्‍या पावसाने पाठ फिरविल्‍याने ‘ऑक्‍टोबर हीट’ची झळ अधिक तीव्र झाली आहे. महिना संपायला आला असताना, अद्यापही ‘ऑक्‍टोबर हीट’चा तडाखा कायम आहे. सद्यःस्‍थितीत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहात आहे. सायंकाळनंतर मात्र वातावरणात काही प्रमाणात गार वारा राहात असल्‍याने मिश्र वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. सोमवारी (ता. १९) नाशिकचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्‍त राहात होते. सप्‍टेंबरपासूनच तप्त उन्‍हाचा सामना जिल्‍हावासीयांना करावा लागत आहे. साधारणतः सकाळी नऊपासूनच प्रखर सूर्यकिरणांमुळे जनजीवन प्रभावित होत आहे. दुपारी अकरा ते तीनच्‍या दरम्‍यान तीव्रता सर्वाधिक राहात आहे. काही दिवसांमध्ये हवामान विभागाने हलक्‍या सरींचा अंदाज वर्तविला असला तरी, प्रत्‍यक्षात परतीच्‍या पावसाने पाठ फिरविली आहे. पुढील काही दिवस उन्‍हाची तीव्रता अशाच प्रकारे कायम राहाण्याची शक्‍यता आहे. अशा वातावरणात आरोग्‍याची विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला आरोग्‍य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी दिला आहे.
Read Entire Article