करापूर प्रकरणाला नवे वळण! लाखोंच्या व्यवहाराचा कथित ऑडिओ समोर; निष्पक्ष तपासाची मागणी

1 month ago 5
ARTICLE AD

Mumbai Crime News : गोव्यातील बिचोलीम तालुक्यातील करापूर येथील 'वन गोवा' प्रकल्पाभोवती सुरू असलेल्या वादाला आता एका कथित आर्थिक व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपमुळे नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आधीच सिद्धेश तारी आणि प्रितेश साळगावकर यांना कथित खंडणी प्रकरणात अटक केली आहे. प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात एकूण सुमारे 41 लाखांच्या कथित व्यवहारांचा उल्लेख झाल्याची माहिती समोर येत आहे.

करापूर-सारवण परिसरात या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून मोठे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आता समोर आलेल्या या कथित खंडणीच्या आरोपांनी आणि ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात आता एक कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये “सिद्धेशचे तुम्ही 30 केले” तसेच “सिद्धेशला तुम्ही 30 लाख दिले” अशा स्वरूपाचे स्पष्ट उल्लेख ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे.

या संभाषणात 30 ते 35 लोक, त्यांच्या सह्या, प्रकल्पाचे काम थांबवणे आणि आंदोलनाशी संबंधित परिस्थितीबाबत चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. संभाषणाच्या एका भागात संबंधित व्यक्ती “माझी पण गाडी आहे, गाडीला खर्च आहे, पैसे नाहीत आता” असे म्हणताना ऐकू येते. तसेच “मी कुठेच लाईव्हसुद्धा केले नाही, आम्ही काय करतो ते शांततेत करतो, मला टाइम द्या” असे वक्तव्यही या ऑडिओमध्ये असल्याचा दावा केला जात आहे.

या कथित ऑडिओ क्लिपमुळे करापूर-सारवण परिसरातील आंदोलन आणि कथित आर्थिक व्यवहार यांच्यात काही थेट संबंध आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑडिओमध्ये उल्लेख होणारी 30 लाखांची रक्कम नेमकी कशासाठी होती, 30 ते 35 लोकांच्या सह्या आणि आंदोलन यांचा या पैशांशी काय संबंध आहे, तसेच या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणत्या मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे, याचा शोध घेणे आता गरजेचे बनले आहे.

या सर्व गंभीर पार्श्वभूमीवर संबंधित कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. 30 लाखांच्या रकमेचा नेमका संदर्भ काय आहे, तसेच फोन कॉल्स, व्हॉट्सॲप (WhatsApp) संभाषणे आणि इतर डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी करून या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण साखळी स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे.

करापूर येथील प्रकल्पाला झालेला स्थानिक विरोध, त्यानंतर समोर आलेले खंडणीचे आरोप आणि आता व्हायरल झालेली 30 लाखांची कथित ऑडिओ क्लिप या सर्व बाबींची स्वतंत्रपणे चौकशी न करता त्यांचा परस्परसंबंध तपासणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे .

Read Entire Article