कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार शमा भाटेंना

1 week ago 2
ARTICLE AD
NSK26H33218 : शमा भाटे NSK26H33219 : श्रीकांत ढेरंगे NSK26H33223 : मीनाक्षी पाटील NSK26H33224 : अच्युत गोडबोले ---- कांताई जैन साहित्य-कला जीवन गौरव पुरस्कार शमा भाटेंना उपशीर्षक साहित्य पुरस्कारही जाहीर; श्रीकांत ढेरंगे, मीनाक्षी पाटील, अच्युत गोडबोलेंचा समावेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ सुप्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांना, तर श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोंबरे पुरस्कारासाठी श्रीकांत ढेरंगे (संगमनेर, जि. अहिल्यानगर), तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी अच्युत गोडबोले (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे, तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोंबरे, ना. धों. महानोर  पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाच्या दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबरला जळगावात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. तीत निवड समितीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या ज्योती जैन, रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. सिसिलीया कार्व्हालो, शंभू पाटील, अशोक जैन व शोभा नाईक (बेळगाव) (दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून) यांची उपस्थिती होती. --- कोट कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना यथोचित गौरव व्हावा, यासाठी विविध स्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहीर करताना आनंद होत आहे. - अशोक जैन --- कोट संपूर्ण महाराष्ट्रातील प्रातिनिधीक जाणकार साहित्यिकांच्या समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कारप्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात. - डॉ. भालचंद्र नेमाडे, अध्यक्ष, निवड समिती
Read Entire Article