कांद्यापाठोपाठ ज्वारी, गव्हाचे क्षेत्रही घटले

3 days ago 2
ARTICLE AD
पान-३ ३६-३ कांद्यापाठोपाठ ज्वारी, गव्हाचे क्षेत्रही घटले दुष्काळाची दाहकता : पावसाचे प्रमाण घटल्याने पेरणी क्षेत्रात घट सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२७ : दुष्काळामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडीपाठोपाठ रब्बी हंगामाच्या पेरणीतही घट झाली आहे. हरभरा शंभर टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता असून चाऱ्यासाठी उपयोगी ठरणारा उन्हाळी मका १६१ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधे दुष्काळ जाहीर झाला आहे. येथील शेतकऱ्यांना मदतीचा प्रतीक्षा लागून असली तरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. रब्बीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र एक लाख १४ हजार हेक्टर आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने सरासरी १.३० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा दुष्काळामुळे हे क्षेत्र १.२५ लाख हेक्टरवर घसरले आहे. जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के पेरण्या होतील, असा अंदाज आहे. यात ज्वारी, गहू, मका, हरभरा व उन्हाळ कांद्याचा समावेश होतो. कांद्याचे सरासरी क्षेत्र दोन लाख चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी २.२५ लाख हेक्टरवर लागवड झाल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यंदा अवघे १.२५ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के घट झाली आहे. तसेच ज्वारीचे ३२०० हेक्टर, गहू ४० हजार, मका १५ हजार, हरभरा ३३ हजार व इतर पिकांचे १५०० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरासरी ९३ हजार २०० हेक्टरवर (८१.७४ टक्के) पेरणी होईल. दुष्काळामुळे कांद्यापाठोपाठ ज्वारी, गहू, हरभरा क्षेत्राच्या पेरणीत प्रामुख्याने घट झाली आहे. ------------ पीकनिहाय पेरणी ज्वारी-७५.८३ टक्के गहू-६२.२७ टक्के मका-१६१.५७ टक्के इतर-५१.३५ टक्के एकूण-८१.७४ … कांदा सर्वसाधारण क्षेत्र : २.४ लाख हेक्टर २०२५ लागवड : २.२५ लाख हेक्टर २०२६ लागवड : १.२५ लाख हेक्टर
Read Entire Article