के.सी. पार्क परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात

2 weeks ago 1
ARTICLE AD
मेनफिचर शहर टुडे पान चारसाठी -------- लोगो : नव्या वस्त्या/जुन्याच समस्या ------------- शहर पानाच्या वृत्तमालिकेचे के.सी.पार्क मधील समस्या फोटो. ----------- NSK26H32227 जळगाव : पक्की गटार नसल्याने तुंबलेले सांडपाणी व आजुबाजुला वाढलेले गवत. ------------- फोटो क्रः NSK26H32228 जळगाव : खुल्या भूखंडावर वाढलेले गवत व साचलेले परिसरातील सांडपाणी. ------------ NSK26H32229 रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा. ------------ फोटो क्रः NSK26H32232 पथदिव्यांअभावी रात्री रस्त्यावर अंधार असतो. ------------- फोटो क्रः NSK26H32234 रस्त्यालगतच्या नाल्यात साचलेला कचरा. (सर्व छायाचित्रे : संधिपाल वानखेडे) केसी पार्क परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात ------------ सांडपाण्यामुळे दुर्गंधी; महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवासी त्रस्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शहरातील के. सी. पार्क परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने व गटारींमधील साचलेली घाण, सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्याबाबत रहिवाशांमधून चिंता व्यक्त होत आहे. स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष कधी जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ....... गटारींच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर के. सी. पार्क परिसरात गटारींची नियमित साफसफाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारींमध्ये कचरा व सांडपाणी साचल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्यास डासांची पैदास होऊन डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गटारींची नियमित स्वच्छता करणे व सांडपाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. ...... स्वच्छतेअभावी आरोग्याचा प्रश्न शहरातील वाढत्या वस्त्यांमध्ये स्वच्छतेच्या समस्या गंभीर होत असताना के. सी. पार्क परिसरातील परिस्थितीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परिसरातील रस्ते व गटारींची नियमित स्वच्छता न झाल्यास नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. पावसाचे पाणी किंवा सांडपाणी साचून राहिल्यास डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ तात्पुरती साफसफाई न करता नियमित स्वच्छतेचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ..... प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळणे, ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे के. सी. पार्क परिसरातील गटारींची पाहणी करून साचलेला कचरा काढणे, सांडपाण्याचा निचरा सुरळीत करणे व नियमित साफसफाईसाठी कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागानेही परिसराची पाहणी करून डास प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. मूलभूत नागरी सुविधांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. नागरिकांना वारंवार तक्रारी करण्याची वेळ येण्याऐवजी संबंधित यंत्रणेने नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अन्यथा अस्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ....... कोट गटारींमध्ये सांडपाणी व कचरा साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंगी व मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ तक्रारीनंतर साफसफाई न करता नियमित स्वच्छतेचे नियोजन करावे. - स्थानिक रहिवासी, जळगाव.
Read Entire Article