घरफोडीचे मध्य प्रदेश कनेक्शन

1 week ago 2
ARTICLE AD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 33060 धुळे : घरफोडीतील संशयितांसह उपस्थित एलसीबीचे पोलिस पथक. -- दिवसा घरफोडीचे मध्य प्रदेश कनेक्शन - पोलिसांकडून ५.६९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोघे संशयित - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : शहरातील शिंदेनगरात दिवसा झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हा शाखेने छडा लावला. या प्रकरणात इंदूर (मध्य प्रदेश) येथील संशयित अकरम अब्दुल गफार अब्बासी याला, तर चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी देवास (मध्य प्रदेश) येथील संशयित शेख बासेद शेख सबुर याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख ६९ हजारांचे सोने-चांदीचे दागिने व लगड हस्तगत केली. दुसरा संशयित जावेद अब्दुल गफार अब्बासी फरारी आहे. शहरातील प्रणय राजेंद्र खंडेलवाल (रा. शिव वसंत अपार्टमेंट परिसर, शिंदेनगर) यांच्या घरात सात ऑक्टोबरला दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास घरफोडी झाली होती. घरातील लॉकरमधून चार लाख १२ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक विश्लेषणातून अकरम व त्याचा भाऊ जावेद यांची नावे निष्पन्न झाली. पथकाने इंदूर येथून अकरमला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीचे दागिने देवास येथील शेख बासेद याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने शेख बासेदकडून सोन्याचे सहा ग्रॅम टोंगल, २५ ग्रॅम सोन्याची लगड व गोळी, तसेच एक किलो ३०० ग्रॅम चांदीची लगड हस्तगत केली. या मुद्देमालाची एकूण किंमत पाच लाख ६९ हजार ४५० रुपये आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक ढोके, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, धनंजय मोरे, तसेच प्रल्हाद वाघ, दिनेश परदेशी, देवेंद्र ठाकूर, महेंद्र सपकाळ, हर्शल चौधरी, अमोल पाटील, अमोल जाधव, सिद्धार्थ निकम यांच्या ही कारवाई पथकाने केली.
Read Entire Article