घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयिताला ठोकल्या बेड्या

1 week ago 3
ARTICLE AD
घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयिताला ठोकल्या बेड्या नंदुरबार : घरफोडीच्या गुन्ह्यातील एकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितावर मालमत्तेबाबतचे एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. शहरातील नळवा रोडवर असलेल्या योगेश्वर कॉलनीत चोरट्याने बंद घरातून सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला होता. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदरची चोरी ही चोपडा (जि.जळगाव) येथील संशयित प्रवीण लोटन कोळी याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने संशयित प्रवीण कोळी यास ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता संशयिताच्या खिशातून २ मोबाईल जप्त करण्यात आले. त्यापैकी १ मोबाईल हा नंदुरबार येथून चोरी केलेला होता. तर चोरीचे दागिने राहुल ऊर्फ भावशा बळीराम बावीस्कर (रा. सुटकार ता. चोपडा जि. जळगाव) यास दिल्याचे सांगितले. राहुलला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी नंदुरबार शहरातून चोरी केली असल्याचे त्याने सांगितले. ताब्यात घेण्यात आलेला संशयित प्रवीण कोळी याच्यावर चोपडा, अमळनेर पोलिस ठाण्यात १७ व राहुल बावीस्कर याच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात यापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे.
Read Entire Article