चूल पेटवण्याची वेळ

5 days ago 2
ARTICLE AD
फक्त शहर टुडे पान तीनसाठी -------------- लाडक्या बहिणींवर चूल पेटवण्याची वेळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : पाचोरा शहर व परिसरातील लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे ऐन सणासुदीत चूल पेटविण्याची वेळ आली आहे. धूर व चटक्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे लाडक्या बहिणी वैतागल्या आहेत. पाचोरा शहरासह परिसरात १५ दिवसांपासून गॅस सिलिंडर टंचाईचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर नोंदणीसाठी कंपनीच्या वेबसाईटवर करावी लागणारी नोंदणी, त्यानंतर येणारा ‘ओटीपी’ यासोबतच सिलिंडरसाठी माराव्या लागणाऱ्या चकरा, घरपोच सिलिंडरसाठी मोजावे लागणारे जास्तीचे पैसे अशा विविधांगी कारणांमुळे सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या टंचाईमुळे ग्रामीण भागातील बहुतांश लाडक्या बहिणींवर चूल पेटवून स्वयंपाक करण्याचा बाका प्रसंग ओढवला आहे. दिवाळी फराळासाठीच्या विविध वस्तू तयार करण्यासाठीदेखील चुलीचाच वापर करावा लागणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया लाडक्या बहिणी व्यक्त करीत आहेत. चुलीसाठी लागणारे लाकडाचे सरपण गोळा करण्यासाठी लाडक्या बहिणींची लगबग वाढली आहे. गावाच्या वेशीवर व शेतशिवारात सकाळपासून सरपण गोळा करण्यासाठी लाडक्या बहिणींना घराबाहेर पडावे लागते. दोन-चार दिवस पुरेल एवढे सरपण घेऊन लाडक्या बहिणी घरी परततात. घरगुती कामे आटोपून चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. सिलिंडर मिळविण्यासाठीची प्रक्रिया सोपी करावी. अनेकांकडे मोबाईल नसल्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरून नोंदणी करावी लागते. वेळेवर संबंधितांकडून ‘ओटीपी’ सांगितला जात नाही. नोंदणी केल्यावर सिलिंडर लवकर मिळत नाही. त्यासाठी चकरा माराव्या लागतात, अशा प्रतिक्रिया लाडक्या बहिणींकडून व्यक्त होत आहेत.
Read Entire Article