जिल्हा परिषद कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा २५ लाख

1 day ago 2
ARTICLE AD
जिल्हा परिषद कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा २५ लाख सोलर कर्ज योजनेची घोषणा; वर्गणी डिपॉझिटची रक्कम १२.५० टक्क्यांवरुन १० टक्के सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२९ : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या मुदत कर्जाची कमाल मर्यादा २० लाखांवरून २५ लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील गिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या व्यवस्थापन समितीने शनिवारी (ता.२४) पहिलीच बैठक घेत जिल्ह्यातील आठ हजार सभासदांच्या हिताचे काही निर्णय घेतले. कर्ज मर्यादेत वाढ केली आणि कर्ज वितरणावेळी सभासदांकडून घेण्यात येणार्या वर्गणी डिपॉझिटची रक्कम कमी केली आहे. पूर्वी १२.५० टक्के रक्कम घेण्यात येत होती. यापुढे ती १० टक्के घेण्यात येईल. सभासदाचे निधन झाल्यास त्यांच्या वारसांना २५ हजार रुपये मिळत होते. ही रक्कम दुप्पट करून ५० हजार करण्यात आली. विशेष म्हणजे त्यासाठी विमा रकमेत कुठलीही वाढ केलेली नाही. बँकेतून पेन्शन घेत असलेल्या पेन्शन खातेदारांना दोन लाखांपर्यंत कर्जाची सुविधा चालू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापन समिती सदस्य मंदाकिनी पवार व प्रमोद निरगुडे यांनी दिली. या शिवाय बँक आता सोलर कर्ज योजना सुरु करत असून सोलर बसवण्यासाठी तीन लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यातही शासनाची ७८ हजारांच अनुदान मिळेल. त्यामुळे सभासदांचा या योजनेला अधिकाधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा अध्यक्ष गिते यांनी व्यक्त केली. …१६-१ बँकेच्या नवीन घोषणा - सभासदांना विनाशुल्क मोबाईल बँकिंग ॲप - खातेदारांना आयएमपीएस, आरटीजीएस व एनईएफटीच्या सुविधा मोफत - १ नोव्हेंबरपासून श्री लक्ष्मी मासिक उत्पन्न ठेव योजना - सोल कर्ज योजना - सोने तारण व गृह कर्ज योजनेत सुधारणा
Read Entire Article