जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा

1 day ago 2
ARTICLE AD
जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा उपशीर्षक ‘प्रशासकराज’चा पंचवार्षिक कार्यकाळही पूर्णात्वाकडे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणातील निकालानंतर राज्यातील उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याद्वारे आता जळगाव जिल्हा परिषदेसही निवडणुकीचे वेध लागले असून, येत्या मार्च २०२७ मध्ये जिल्हा परिषदेतील प्रशासक कार्यकाळही पूर्ण होत आहे. तब्बल पाच वर्षांच्या ‘प्रशासकराज’नंतर जिल्हा परिषदेत निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या मुद्यावरून न्यायालयीन लढाई सुरू होती. ज्या जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत होते, त्या सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबर २०२५ मध्ये पार पडल्या. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जात असलेल्या जिल्हा परिषदा निवडणुकीपासून वंचित राहिल्या. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्याबाबतचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील अशा उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने जळगाव जिल्हा परिषदेलाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रशासकीय कार्यकाळास पाच वर्षे जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत मार्च २०२२मध्ये संपली. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासकराज होते. आता मार्च २०२७ मध्ये प्रशासकांच्या कार्यकाळाचीही पंचवार्षिक टर्म पूर्ण होत आहे. त्याआधीच निवडणूक होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा परिषदेची प्रस्तावित निवडणूक जुन्या आरक्षण रचनेनुसारच होईल, अशी शक्यता अधिक आहे. ----- जिल्हा परिषदेचे मागील संख्याबळ भाजप : ३३ शिवसेना : १४ राष्ट्रवादी कॉंग्रेस : १६ कॉंग्रेस : ४ एकूण : ६७
Read Entire Article