जेईई मेन्‍स पहिल्‍या सत्राची नोंदणी २२ नोव्‍हेंबरपर्यंत

4 days ago 3
ARTICLE AD
जेईई मेन्‍स पहिल्‍या सत्राची नोंदणी २२ नोव्‍हेंबरपर्यंत देशभर २० ते २८ जानेवारीदरम्‍यान परिक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ः नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) मेन्‍स २०२७ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत संकेतस्‍थळावर परीक्षा अर्ज भरून प्रविष्ठ होता येईल. परीक्षेचे आयोजन २० ते २८ जानेवारी २०२७ दरम्‍यान देशभरात आयोजित केले जाणार आहे. आयआयटीसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन्‍स परीक्षा घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ या वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जेईई मेन्‍सच्‍या दोन संधी उपलब्‍ध करुन दिल्‍या जाणार आहेत. यापैकी पहिल्‍या संधीतील परीक्षा जानेवारीमध्ये घेतली जाईल. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. ही परीक्षा मराठीसह इंग्रजी, हिंदी, असमिया, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा एकूण १३ भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार असून, बी.आर्च मधील ड्रॉइंग टेस्ट ही ऑफलाइन पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल. --- अशा आहेत तारखा... * ऑनलाइन अर्ज, शुल्‍क भरणे ः २२ नोव्हेंबर * विलंब शुल्‍कासह अर्ज भरणे ः २३ ते २६ नोव्हेंबर * अर्जात दुरुस्तीची मुदत ः २७ ते २९ नोव्हेंबर * परीक्षा शहरांची घोषणा ः ३० डिसेंबर * प्रवेशपत्राची उपलब्‍धता ः१३ जानेवारी * परीक्षेची तारीख ः २० ते २८ दरम्‍यान ---
Read Entire Article