तहसीलदारांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट

6 days ago 3
ARTICLE AD
33471 कोंढावळ : मृत शेतकरी राजेंद्र खोंडे यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करताना तहसीलदार संभाजी पाटील समवेत विनोद अहिरे, रत्ना ठाकरे आदी. -------------------- तहसीलदारांनी घेतली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट ​वडाळी, ता. २४ : ​कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपविणारे कोंढावळ येथील शेतकरी राजेंद्र खोंडे यांच्या कुटुंबीयांची तहसीलदार संभाजी पाटील यांनी शनिवारी (ता.२४) भेट घेत कुटुंबीयांना शासनाकडून आवश्‍यक ती मदत मिळण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करेल, असे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले. कोंढावाळ (ता. शहादा) येथील शेतकरी राजेंद्र देवचंद खोंडे (वय ५५) यांनी ता. १४ ऑक्टोबर रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती समजल्यानंतर घेण्यासाठी तहसीलदार संभाजी पाटील यांनी शनिवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांशी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या. नियमानुसार शासनाच्या वतीने योग्य ती सर्व आर्थिक व प्रशासकीय मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिले. यावेळी उपसरपंच विनोद अहिरे, कोतवाल रत्ना ठाकरे, भिकूबाई खोंडे (पत्नी), सागर खोंडे, किरण खोंडे, छोटू खोंडे (बंधू), गोपाल खोंडे, समाधान खोंडे (पुतण्या) आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Read Entire Article