त्र्यंबकेश्‍वरची जबाबदारी सीईओ ओमकार पवारांवर

2 days ago 3
ARTICLE AD
फोटो : 33712/13 नाशिक ः ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्‍वर येथील कामांची पाहणी करताना सीईओ ओमकार पवार. … त्र्यंबकेश्‍वरची जबाबदारी सीईओ ओमकार पवारांवर कामे तातडीने पूर्ण करण्याच्या संबंधित यंत्रणांना सूचना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२८ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता.३१) त्र्यंबकेश्‍वरमधे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सीईओ पवार यांनी मंगळवारी कुशावर्त तीर्थ तसेच त्र्यंबकेश्वर येथील गंगाघाट परिसराची पाहणी करून संबंधित कामांचा आढावा घेतला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करणे आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने त्यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन कामांची सद्यःस्थिती जाणून घेतली. कुशावर्त तीर्थ परिसराची पाहणी करून तेथील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील गंगाघाट परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. कामांची सद्यस्थिती, उर्वरित कामे आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता दीपक पाटील, तहसीलदार गणेश जाधव व गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते.
Read Entire Article